सर्वोत्तम लॅपटॉप कसा निवडायचा? | How to choose Best Laptop?

 

How to choose Best Laptop


How to choose Best Laptop


सर्वोत्तम लॅपटॉप कसा निवडायचा?

लॅपटॉपच्या स्क्रीनचा आकार:

लॅपटॉपची स्क्रीन  १३इंच / १४इंच / १५इंच / १६इंच आकारात येते. तुम्हाला किती इंच आकाराचा लॅपटॉप घ्यायचा आहे, हे सर्वस्वी तुमच्या पैशांच्या अंदाजपत्रकावर आणि तुमच्या सोयीवर अवलंबून आहे.

आपणास आपला लॅपटॉप कुठेही अगदी सहजरीत्या सोबत घेऊन जायचा असेल तर  १३इंच / १४ इंच आकाराचा लॅपटॉप योग्य आहे. आपण गेमिंग किंवा त्याहून चांगले व्हिज्युअलायझेशन शोधत असल्यास १५ इंच / १६ इंच आपल्यासाठी सर्वोत्तम आहे.

तसेच घरात जर वयस्क व्यक्ती असेल किंवा आपण घरातुन ऑनलाईन काम करणार असाल किंवा तुमच्या मुलांच्या ऑनलाईन क्लासेससाठी लॅपटॉपची स्क्रीन जास्त मोठ्या आकाराची असेल तर तुमच्या डोळ्यांच्या दृष्टीने ते योग्य आहे.

लॅपटॉपच्या स्क्रीनचा प्रकार:

तीन वेगवेगळ्या प्रकारचे एलसीडी स्क्रीन आहेत: ट्रान्समिसिव्ह, ट्रान्सफ्लेक्टीव्ह आणि रिफ्लेक्टीव्ह . लॅपटॉप स्क्रीनमधील आणखी एक फरक पाहण्यात येतो तो म्हणजे  लॅपटॉप वाइडस्क्रीन स्क्रीन आहे आणि तो एलईडी बॅकलिट आहे का?

एलईडी बॅकलिट म्हणजे काय? 

कमी प्रकाश वातावरणात किंवा अंधारात बॅकलाइट दृश्यमान करण्यासाठी लॅपटॉपच्या कीबोर्डवर अक्षरे आणि चिन्हे प्रकाशित करतात, ज्यामुळे लॅपटॉपचा वापर करताना तुमच्या डोळ्यांना त्रास होऊ नये. बऱ्याच बॅकलाइट्स पांढऱ्या प्रकाशाचा उत्सर्जन करतात. इतर रंगांचे उत्सर्जन करणारे बॅकलाइट्स देखील असतात, या बॅकलाईट्स मुख्यतः गेमिंग लॅपटॉपमध्ये आढळतात.

लॅपटॉपसाठी सध्या तीन प्रदर्शन (स्क्रीन) प्रकार उपलब्ध आहेत आणि तिसरा बाजारात नुकताच उपलब्ध झाला आहे. 

ट्विस्टेड  नेमॅटिक (टीएन), इन-प्लेन स्विचिंग (आयपीएस), आणि ऑर्गेनिक लाइट-उत्सर्जक डायोड (ओएलईडी). यातील प्रत्येक पॅनेलचे वेगवेगळे फायदे आणि तोटेसुद्धा आहेत. 

लॅपटॉप स्क्रीनचे प्रदर्शन पृथक्करण / निराकरण:

हे एचडी (हाय डेफिनिशन) , एफएचडी (फुल हाय डेफिनिशन), यूएचडी / ४ केएचडी (अल्ट्रा हाय डेफिनेशन) मध्ये येते.

जर आपल्याला लॅपटॉपची आवश्यकता मूलभूत हेतूंसाठी असेल तर एचडी स्क्रीन ठीक आहे. सामान्यत: लोक एफएचडी (FHD) किंवा यूएचडी (UHD) चे लॅपटॉप घेतात. उच्च प्रकाराचे गेमिंग खेळण्यासाठी किंवा पिक्चर्सच्या गुणवत्तेचा सर्वोत्तम अनुभव घेण्यासाठी एफएचडी किंवा यूएचडीचे लॅपटॉप नेहमीच अव्वल ठरतात.  

प्रोसेसर (Processor):

दोन मुख्य कंपन्या प्रोसेसरमध्ये अग्रगण्य आहेत. इंटेल आणि  एएमडी. दोन्ही कंपन्यांनी मॉडेल नंबरनुसार त्यांच्या प्रोसेसरना नाव दिले आहेत.

इंटेल आय३, आय५, आय७ आणि आय९ (यामध्ये त्यांच्या सुधारित आवृत्ती असतात ज्याला आपण  इंटेल आय ३ सोबत  ५ वी आवृत्ती )/ सोबत  ६ वी आवृत्ती, ७ वी आवृत्ती म्हणून विविध जनरेशनचे  प्रोसेसर बाजारात उपलब्ध आहेत.

एएमडीमध्ये एएमडी रायझन ९-५९५०एक्स, एएमडी रायझन ९- ५९००एक्स, एएमडी रायझन ७-५८००एक्स अशी भिन्न प्रकारचे मॉडेल्स उपलब्ध आहेत. बाजारात इतर एएमडी प्रोसेसरसुद्धा उपलब्ध आहेत.

आय३, आय५, आय७ आणि आय९ मधील फरक:

सामान्यत: आय३ लॅपटॉप ड्युअल कोर प्रोसेसरसह येतो, आय५ ड्युअल कोअर किंवा क्वाड कोर प्रोसेसरसह येतो, आय७  क्वाड कोर किंवा हेक्झा कोर प्रोसेसरसह येतो आणि आय९ हेक्सा कोर किंवा ऑक्टा कोर प्रोसेसरसह येतो.

ड्युअल कोअर म्हणजे काय?

समजा लॅपटॉपचा प्रोसेसर म्हणजे मानवी मेंदू आणि त्याच्या आज्ञेनुसार काम करणारे दोन हाथ हेच लॅपटॉपचे दोन कोर अर्थात ड्युअल कोअर. अगदी त्याचप्रमाणे क्वाड कोअर म्हणजे चार हाथ, हेक्सा कोअर म्हणजे सहा हाथ आणि ऑक्टा कोअर म्हणजे आठ हाथ. 

आता समजा, जर एखाद्या व्यक्तीकडे क्वाड कोअर (चार हात) असतील तर तो ड्युअल कोअर (दोन हात) असलेल्या व्यक्तीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे वेगवान कामगिरी करेल. त्याचप्रमाणे आपल्या प्रोसेसरमध्ये दोनपेक्षा जास्त कोअर असलेल्या आपल्या लॅपटॉपवर कोणतीही कृती अथवा ऑपरेशन जास्त वेगवान पटीने होते, म्हणजेच कामाचा वेग जास्त जलद गतीने होतो.

म्हणजेच ड्युअल कोअर प्रोसेसर पेक्षा क्वाड कोअर उत्तम,  हेक्सा कोअर त्याही पेक्षा जास्त उत्तम आणि ऑक्टा कोअर या सर्वांपेक्षा अधिकच सर्वोत्तम कामगिरी करतो.

जनरेशन – आवृत्ती:

जर एखादा लॅपटॉप आय५ प्रोसेसरसह  ५ व्या आवृत्तीचा असेल आणि दुसरा एखादा लॅपटॉप आय५ प्रोसेसरसह  ६ व्या आवृत्तीचा असेल तर याचा अर्थ असा होतो, आय५ प्रोसेसरसह  ६ व्या आवृत्तीचा लॅपटॉपच्या या आवृत्ती मध्ये सुधारणा केली आहे. 

आय५ प्रोसेसरसह ५ व्या आवृत्तीच्या लॅपटॉप पेक्षा ६वी आवृत्ती ही अद्ययावत आहे. (सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जुन्या आवृत्तीच्या प्रोसेसरमधले काही दोष नव्या आवृत्तीच्या प्रोसेसरमध्ये नाहीसे करून त्यात सुधारणा केली आहे किंवा/आणि  जुन्या आवृत्तीच्या प्रोसेसरमध्ये नसणारे  काही नवीन वैशिष्ट्ये नव्या आवृत्तीच्या प्रोसेसरमध्ये सामाविस्ट केली आहेत)

उदाहरणार्थ: दोन एकाच प्रकारच्या, एकाच मॉडेलच्या गाडयांची बाजारात असणारी वेगळी किंमत - जुन्या मॉडेलच्या गाडीतले दोष, त्यात आढळलेले काही बिघाड दुरुस्त करून अथवा  काही नवीन यंत्रणा उपलब्ध करून दिल्याने  नव्या मॉडेलच्या गाडीची किंमत साहजिक वाढतेच.

जर कमी बजेटमुळे तुम्ही आय३ लॅपटॉप घेणार असाल तर त्यामधील जनरेशन (अधिक सुधारीत आवृत्ती) बघा.  आय३ सोबत  १०वी  आवृत्ती किंवा त्यापुढची ११वी आवृत्ती. तसेच आपल्याला इतर ही गोष्टी पहाव्या लागतील.

लॅपटॉप प्रोसेसरचा वेग/ कार्यक्षमता | Laptop Processor Speed:

आपल्याला आपल्या लॅपटॉपचा वेग, त्याची कार्यक्षमता देखील तपासावी  लागेल.

जास्त मूल्य असणारा (GHz) जीएचझेड (गीगा हर्ड्झ) प्रोसेसर लॅपटॉपमध्ये आहे का हे देखील तपासावे लागेल. प्रोसेसरचे मूल्य जास्त म्हणजे उत्कृष्ट कार्यक्षमता.

१.८ गीगाहर्ट्झ व ३.२ गीगाहर्ट्झ प्रोसेसरशी  तुलना केली तर १.८ गीगा हर्ड्झपेक्षा  ३.२ गीगा हर्ड्झचा प्रोसेसर नेहमीच  चांगला  आणि वेगवान पद्धतीने कार्य करतो.

एएमडी प्रोसेसरमधील फरकः

एएमडी रायझन ९-५९५०एक्स १६ कोर प्रति ३२ थ्रेड (१६सी / ३२टी) सह आहे, एएमडी रायझन ९- ५९०० एक्स १२ कोर प्रति २४ थ्रेड्ससह (१२सी / २४टी), एएमडी रायझेन ७-५८०० एक्स ८ कोर प्रति १६ थ्रेड्स सह येतो ( ८सी / १६टी) इत्यादी. इंटेलच्या तुलनेत एएमडी चे प्रोसेसर स्वस्त आहेत.

हार्ड डिस्क चे  प्रकार आणि संचयन क्षमता  | Hard Disk Type & Storage Capacity:

मुळात लॅपटॉपमध्ये ३ प्रकारच्या हार्ड डिस्क बाजारात उपलब्ध आहेत. एक HDD - एचडीडी (हार्ड डिस्क ड्राइव्ह), दुसरी SSD - एसडीडी (सॉलिड डिस्क ड्राइव्ह) आणि तिसरी SSHD - एसएसएचडी (सॉलिड स्टेट हायब्रिड ड्राइव्ह्स). आजकाल लोक एसएसडी हार्ड डिस्कला प्राधान्य देतात.

एचडीडी च्या तुलनेत एसडीडी हार्ड डिस्क थोडी महाग आहे. कारण एसएसडी हार्ड डिस्कमध्ये  एचडीडी हार्ड डिस्क पेक्षा थोडे वेगळे आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरलेले आहे. तसेच एसएसडी हार्ड डिस्कचे आयुष्य एचडीडीपेक्षा जास्त आहे.

एचडीडी आणि  एसएसडी  मध्ये कोणती हार्ड डिस्क जास्त चांगली आहे?

एचडीडी - हार्ड डिस्क ड्राइव्ह आणि एसएसडी - सॉलिड स्टेट ड्राइव्हमधील फरक डेटा संचयित आणि पुनर्प्राप्त करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या तंत्रज्ञानामध्ये आहे. .

एसएसडीमध्ये कोणताही हलणारा भाग नाही ज्याला आपण इंग्रजीत मुव्हिंग  पार्ट म्हणतो.    एसएसडी मध्ये आर / डब्ल्यू (R/W – Read & Write ) - वाचन लेखन करण्याची क्षमता एचडीडी पेक्षा अधिक वेगवान आहे.

एचडीडी स्वस्त आहेत आणि आपल्याला त्यात अधिक स्टोरेज स्पेस (साठवण/ संचयित करण्याची जागा) मिळू शकतात.

तथापि एसएसडी वेगवान, वजनाने हलकी, अधिक टिकाऊ आणि कमी उर्जा वापरतात.

सामान्यत: एसएसडी एचडीडीपेक्षा अधिक विश्वासार्ह असतात.  एसएसडी सहसा कमी उर्जा वापरतात आणि परिणामी बॅटरी जास्त काळ चालते कारण डेटा प्रवेश बर्‍याच वेगवान असतो आणि साधन (डिव्हाइस) बर्‍याच वेळा निष्क्रिय असते.

एचएचडी बाबतीत म्हणाल तर त्यांच्या हालचाल करणाऱ्या (स्पिनिंग) डिस्कसह, जेव्हा एचएचडी आपले कार्य प्रारंभ करतात तेव्हा त्यांना एसएसडीपेक्षा अधिक ऊर्जेची आवश्यकता  लागते.

एसएसडी वापण्याचे काय नुकसान आहे? । Disadvantage of SSD?

किंमतः सॉलिड स्टेट ड्राईव्हचा सर्वात मोठा गैरफायदा म्हणजे किंमत. एसएसडीची किंमत पारंपारिक हार्ड डिस्क ड्राइव्हपेक्षा जास्त असते.

(लॉस्ट डेटा रिकव्हरी) हरवलेल्या डेटाची पुनर्प्राप्ती: जुना डेटा पुनर्प्राप्त करण्यात असमर्थता हा एसएसडीचा सर्वात मोठा तोटा आहे. ड्राइव्हवरून डेटा कायमचा आणि पूर्णपणे निघून जातो (डिलीट होतो).

आपल्याला  कोणती स्टोरेज ड्राइव्ह आपल्यासाठी सर्वोत्तम कार्य करेल हे आपल्या गरजा निर्धारित करून ठरवावे लागेल. 

आपण प्रोग्रामर अथवा गेमर असल्यास किंवा आपण व्हिडिओ एडिटिंग / गेमिंग आणि अन्य उच्च प्रतीच्या प्रोग्रामिंग सॉफ्टवेअरचा वापर करत असाल तर आपण शक्यतो एसडीडी हार्ड डिस्क घ्या. जास्त क्षमतेची एचएचडी  आणि  त्याच तुलनेत जास्त क्षमतेची  रॅम (RAM) असेल तर त्यातल्या त्यात काम चालू शकेल, पण त्याचा वेग  एसडीडी हार्ड डिस्कच्या तुलनेत मंदावलेला असेल.

जर तुम्हाला जास्त प्रमाणात डेटा संचयित करायचा असेल तर १ टिबीची एचडीडी  योग्य आहे, पण जास्त वेगाने काम करण्याची हार्ड डिस्क हवी असेल तर किमान ५१२ जीबीची  एसएसडी घ्या.   

जर तुमचे बजेट कमी असेल पण तुम्हाला जास्त स्टोरेज आणि जास्त वेग हवा असेल तर SSHD- एसएसएचडी (सॉलिड स्टेट हायब्रिड ड्राइव्ह्स) तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो.

SSHD एसएसएचडी ही  तरीसुद्धा (SATA SSD) साटा  एसएसडीपेक्षा धीमी आहे, परंतु ती जुन्या हार्ड डिस्कपेक्षा वेगवान आहे. मूलभूतपणे, आपल्याला वाजवी किंमतीत बरेच डेटा संग्रह हवे असल्यास, एसएसएचडी चांगली निवड आहे. जर आपला  प्राधान्यक्रम  गती असेल आणि आपणास विंडोज अधिक उत्तरदायी हवे असेल तर एसएसडी योग्य आहे.

महत्वाची टिप:  जर आपला लॅपटॉप एसएसडी नसेल परंतु त्यात एम.२ (M.2) स्लॉट उपलब्ध असेल तर आपण एसएसडी हार्ड ड्राइव्ह चा वापर करू शकता. १२० जीबी ची एसएसडी साधारणतः  ३००० रुपयात येऊ शकते. यामुळे आपल्याला अतिरिक्त हार्ड ड्राइव्ह मिळेल.

एचडीडी (HDDs) - हार्ड डिस्क ड्राइव्हस्  प्रति गिगाबाईट वाजवी दराने मोठ्या प्रमाणात स्टोरेज देतात.

एसएसडी (SDDs) - सॉलिड स्टेट ड्राइव्हस्  स्मुथ बूटिंग (वेगवान कार्यक्षमता) आणि मल्टीटास्किंग परफॉरमन्स प्रदान करतात आणि पातळ आणि हलक्या लॅपटॉपसाठी चांगले आहेत.

एसएसएचडी (SSHDs) - सॉलिड स्टेट हायब्रिड ड्राइव्ह्स  साऊंड बूटिंग आणि लोडिंगसह परवडणार्‍या किंमतीत जास्तीत जास्त क्षमता प्रदान करतात. 

रॅमचे  प्रकार आणि संचयन क्षमता | RAM Types & storage capacity:

आपले वर्तमान कार्य  हे आपल्या रॅम (रँडम ऍक्सेस मेमरी) वरून लोड केले जातात. रॅम डीडीआर २, डीडीआर ३ आणि डीडीआर ४ प्रकारात येते. डीडीआर ४ सर्वोत्तम आहे.

एचपी पॅव्हेलियन १४ इंच लॅपटॉप १४-ec0033AU मॉडेल नंबरचे तपशीलवार पुनरावलोकन  | Detailed Review of HP Pavilion 14 inch Laptop  model number 14-ec0033AU

HP Pavilion Laptop 14-ec0033AU
प्रतिमा स्रोत: https://www.hp.com/

ठळक मुद्दे:

एचपी पॅव्हेलियन १४-ec0033AU या लॅपटॉपमध्ये काही ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत.  

प्रोसेसर आणि रॅम: 

या लॅपटॉपमध्ये एएमडी रायझन  मालिकेचा ५५००U (AMD Ryzen 5 5500U) प्रोसेसर आहे१६ जीबी रॅम (१५. जीबी वापरण्यायोग्यआणि ५१२ जीबीची एसएसडी हार्ड ड्राईव्ह आहेसामान्यतः  जीबी रॅमपेक्षा अतिरिक्त  जीबी रॅम म्हणजेच १६ जीबी रॅम५१२ जीबीची एसएसडी आणि .१० GHz (गीगा हर्ड्झप्रोसेसरसह  MB L3 कॅशे (cache), हेक्सा  कोरस् (cores), १२ थ्रेडस असल्याने या लॅपटॉपची गती (स्पीडखूप छान आहे.१० GHz ते . GHz (गीगा हर्ड्) कमाल बूस्ट क्लॉक स्पीड आहेस्टोरेज५१२ GB PCIe NVMe M.2 SSD आहे.

ग्राफिक्स आणि डिस्प्ले स्क्रीन 

एएमडी रायझन  ५५००सोबत रेडिओन ग्राफिक्स (AMD Radeon™ Graphics)  
असल्याने गेमिंग कामगिरी सुद्धा छान आहेतसेच १४ इंच (३५. सेमीचीफुल एचडी 
(FHD)(१९२० x १०८०), आयपीएस (IPS), मायक्रोएजअँटीग्लेअर डिस्प्ले स्क्रीन आहे
२५० नीट्स (nits), १५७ ppi, ४५% NTSC आणि  १९२० x १०८० रेसोलुशन सोबत 
अँटीग्लेअर डिस्प्ले असल्याने तुम्ही कितीही वेळ लॅपटॉप वर काम केले तरी तुमच्या 
डोळ्यांना त्रास होत नाहीसध्या मी हा लॅपटॉप सतत -१० तास वापरत आहे.  इतका 
वेळ लॅपटॉप वापरला तरी अँटीग्लेअर डिस्प्लेमुळे माझ्या डोळ्यांना काही त्रास जाणवत नाही.

पोर्ट्स आणि बॅटरी : 

 सुपरस्पीड यूएसबी टाइप-सी १० जीबीपीएस (यूएसबी पॉवर डिलिव्हरीडिस्प्लेपोर्ट .
एचपी स्लीप आणि चार्ज),  सुपरस्पीड यूएसबी टाइप- ५जीबीपीएस हेडफोन/मायक्रोफोन कॉम्बो एसी स्मार्ट पिन एचडीएमआय .०, -सेल४३ वॅट हावर्स 
लिथिएम आयन बॅटरीमिनिटांत अंदाजे 0% बॅटरी जलद चार्ज करण्यास समर्थन 
देतेबॅटरी संपूर्ण चार्ज केल्यावर साधारणतः  तास बॅटरी चालते

कॅमेरा वैशिष्ट्ये: 

एचपी वाइड व्हिजन ७२०p HD कॅमेरा इंटिग्रेटेड ड्युअल ऍरे डिजिटल मायक्रोफोनसह
फिंगरप्रिंट रीडर दिला आहेफिंगरप्रिंट रीडर खूप छान आहे, उत्तमरित्या काम करतो. 

ऑडिओ:  

एचपी ऑडिओ बूस्ट  B&O चा दुहेरी (ड्युअलस्पीकर्स आहेज्यामुळे साऊंड इफेक्ट 
खूपच छान आणि ऐकायला उत्कृष्ट आहे.  

कीबोर्ड आणि इतर वैशिष्ट्ये: 

बॅकलिट कीबोर्ड सह  बिल्ट इन अलेक्सा अर्थात अलेक्सा प्रणाली समाविष्ट केली आहे.
 
नेटवर्किंग: 

रियलटेक वाय-फाय  प्रमाणित ६ (२x२)ब्लूटूथ ५.२ कॉम्बो आहे. ऑप्टिकल ड्राइव्ह 
समाविष्ट नाही.

ऑपरेटिंग सिस्टिम:

या लॅपटॉपमध्ये विंडोज १० होम ६४ बिट ऑपरेटिंग सिस्टिम दिलेली आहेपण तुम्ही 
विंडोज ११ अपडेट करू शकता.  काही ठिकाणी आधीच विंडोज ११ अपडेट करून देतातमायक्रोसॉफ्ट ऑफिस होम आणि स्टुडंट २०१९ दिले आहे

लॅपटॉप चे वजन: 

१.४१ केजी (kg) असल्याने वजनाला अतिशय हलका आहे, त्यामुळे बाहेर इतर कुठेही तुमच्यासोबत घेऊन जावू शकता. 

निष्कर्ष:

₹६०,४००.००   च्या बजेटमध्ये एचपी पॅव्हीलीयॉन चा सर्वोत्तम लॅपटॉप ऍमेझॉन वर तुम्ही ऑनलाईन विकत घेऊ शकता. 


Newest
Previous
Next Post »

कृपया टिप्पणी बॉक्समध्ये कोणताही स्पॅम लिंक प्रविष्ट करू नका. ConversionConversion EmoticonEmoticon