तुझाच मी अन माझीच तु
तुझ्या प्रितीची ही अजब सी
कहानी
मला ओढ लागली तुझ्या
मिलनाची
हे श्वास माझे, तुझे ध्यास घेती
मनाला आस लागे तुझ्या
सोबतीची
अजब सी कहानी ही तुझ्या
प्रितीची
स्वप्नात माझ्या तुला
भेटताना
आनंद माझा गगनात मावेना
गालातल्या त्या तुझ्या हासण्याचा
मोह जडला हृदयाला माझ्या
चमक तुझ्या त्या डोळ्यांची
भुरळ घाले मला चांदण्याची
ओठांच्या तुझ्या नाद खुळा
जीव झाला माझा येडापिसा
मनमोहक सुंदर रूप तुझे
चुंबकासम शक्ती त्यात
आकर्षित करते मजला
साद घालतो रोज तुजला
होशील का माझी तु ?
तुझाच मी अन माझीच तु
- संदीप लक्ष्मण पोळ.
कृपया टिप्पणी बॉक्समध्ये कोणताही स्पॅम लिंक प्रविष्ट करू नका. ConversionConversion EmoticonEmoticon