दीपावली मुहूर्त २०२०

 

दीपावली  मुहूर्तवेळ २०२०


दीपावली  म्हणजे  दिव्यांची आरास, कंदिल आणि दीपमाळांचा झगमगाट. दिवाळी म्हणजे आनंदाचा सण, पाहुण्यांची वर्दळ, नातेवाईकांची भेट, लक्ष्मीपुजनाची  लगबग आणि त्यानंतर सर्वांसोबत फराळावर मारलेला ताव. यंदा दीपावलीला पुजा केव्हा करावी, पूजेची मुहूर्तवेळ याबद्दलची सौ. कल्पना व्हटकर (ज्योतिषशास्त्री) यांची माहिती वाचकांसाठी सादर करत आहे.

वसुबारस (१२-१०-२०२०):

यादिवशी  गाय  आणि  वासरु यांची सांयकाळी पुजा करावी.

पुजा करायला जाताना ४ मोरपिसे सोबत घेवुन जावी व गाईच्या अंगावर फिरवुन घेवुन यावे व जेथे पैसे ठेवले जातात तेथे ठेवावे.  यामुळे लक्ष्मीला तुमच्या घरी येण्यात असलेले अडथळे दुर होतात.

 

धनञयोदशी  दीपदान (१३-१०-२०२०):

दिवाळी हा दीपोत्सव असल्याने दीपदानाला अंत्यत  महत्त्व  आहे

धनञयोदशी ला १ पिठाचा ४ दिशेला चार वाती लावुन थोडी हळद व गुळ तेलात टाकुन दिवा घराबाहेर दक्षिणेकडे  लावावा.

तसेच घराबाहेर १३ व घरात १३ दिवे लावावेत.

 

नरकचतुर्दशी  आणि  लक्ष्मीपुजन (१४-१०-२०२०):

नरकचतुर्दशी ला पहाटे घरात व घराच्या  बाहेर  एकुण ३२ दिवे लावावेत.

लक्ष्मीपुजन ला देव्हाऱ्यात तांबे, पितळ किंवा चांदीचे दिवे किंवा समया तुप घालुन लावाव्यात.  तसेच अजुन ५५ मातीचे दिवे घरात व घराबाहेर लावावेत. यातील दोन दिवे स्वयंपाक  घरात व १ -१ दिवा बेल, तुळस ,केळीचे झाड, पिंपळाच्या झाडाखाली, पाण्याच्या घागरी जवळ, कचरा कुंडी व झाडु जवळ लावावा.

 

बलिप्रतिपदा,  दीपावली  पाडवा  आणि  भाऊबीज (१६-१०-२०२०):

दीपावली  पाडव्याला ३२ दिवे लावावे व भाऊबीजेला २१ दिवे लावावेत.

 

दीपावली  मुहुर्त : 

धनञयोदशीचा मुहुर्त  यावर्षी सांयंकाळी ५:३० ते ५:५९ यावेळेत आहे.  

यावेळेत ५ कणेरीची पाने ठेवुन त्यावर एक एक नाणे ठेवुन फुले ठेवुन दिवे ठेवावेत आणि त्यांना हळद-कुंकू वहावा. मग सर्वञ दिवे लावावेत. त्यात एक पिठाचा  दिवा घराबाहेर  ठेवुन लावावा. त्याच्या अगोदर दिवा  घरात लावु नये. त्यानंतर घरामध्ये अकालमृत्यु येवु नयेत म्हणुन यमाला प्रार्थना करावी यादिवशी सर्व दिव्यांच्या वाती दक्षिणेकडे  तोंड करून लावाव्यात.

त्यांनंतर हात पाय धुवुन, जेथे तुम्ही  नेहमी पैसे ठेवता तेथील जागा स्वच्छ  पुसुन तेथे कुंकवाने स्वस्तिक काढावे, लाल कापड अंथरावे आणि  थोडे धने, हळकुंड ठेवून ॐ कुबेराय नमः  बोलून नमस्कार  करावा.

याच दिवशी सर्व फराळाचा नैवेद्य  देवांना  दाखवावा.

देवांचे वैद्य धन्वन्तरी यांना नमस्कार करावा आणि आपले आरोग्य  चांगले  ठेवण्याची प्रार्थना  करावी.

यादिवशी  नवीन झाडू व भांडी खरेदी करण्याची पध्दत आहे.

 

अभ्यंगस्नान मुहुर्त:

शनिवारी पहाटे  :३१ ला चंद्र उदय होईल. तेव्हापासुन सुर्योदय ६:४७ ला आहे. तो पर्यन्त अभ्यंगस्नान  करावे.

 

लक्ष्मीपुजन  मुहुर्त (१४-१०-२०२०):

सायंकाळी ५:५२ ते ७:५३ स्थिर वृषभ लग्न व लाभ चौघडीत लक्ष्मीपुजन करावे. ज्याना यावेळेत शक्य नाही त्यांनी राञी १२:१७ ते २:२४ सिंह लग्नावर लक्ष्मीपुजन  करावे.

दिवाळी पाडवा मुहुर्त (१६-१०-२०२०):

वहीपुजन  वेळ  - 
पहाटे २:०० ते ३:३५

पतीस ओवाळण्याची वेळ -

सकाळी ६:४८  ते  :३०

सर्व वस्तु खरेदी साठी वेळ -

दुपारी ३:५० ते ६:४५ याच वेळेत भावाला ओवाळण्याचा सुध्दा मुहुर्त आहे.

 

व्यापारी  लोकांनी  लक्ष्मीपुजनाच्या  वेळी लावलेल्या तुपाच्या दिव्यात ३ गोमती चक्र टाकुन ठेवावीत व दुसऱ्या  दिवशी सुर्योदयाला  एका लाल कापडात बांधुन व्यवसायाच्या ठिकाणी जो मुख्य दरवाजा असेल त्याला बांधावीत. यामुळे गिऱ्हाईक  वाढते.

नोकरी लागत नसल्यास किंवा असलेल्या नोकरीत बदल करायचा असल्यास, अशांनी लक्ष्मीपुजनच्या राञी ११ ते १ यावेळेत हनुमानाला लाल गुलाब अर्पण करावा.  बुंदीच्या लाडवाचा नैवेद्य  दाखवून १२ वेळा हनुमान चालीसा वाचावी.

 

मुलांच्या संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असेल, तर  त्यांनी  राञी ११ ते १ यावेळेत सतत श्रीराम श्रीराम हा जप न थांबता करावा.

 

ज्यांना गरीबीतुन बाहेर पडून प्रगती करायची आहे,  त्यांनी लक्ष्मीपुजनच्या  वेळी सव्वा किलो मीठ पुजावे आणि  नंतर  ते  एखादया  महाप्रसादाच्या ठिकाणी  द्यावे.

 

सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी कमी होवुन सुबत्ता येण्यासाठी लक्ष्मीपुजन  पासुन सुरुवात करुन रोज श्रीसुक्त १ वेळा व लक्ष्मी सूक्त १ वेळा वाचावे.

 

कर्जे  लवकर फिटण्यासाठी लक्ष्मीपुजन पासुन रोज हा मंञ १०८ रोज सकाळी जपावा.

महादेव्यै च विद्महे विष्णुपत्न्ये च धीमही तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात.

 


Previous
Next Post »

कृपया टिप्पणी बॉक्समध्ये कोणताही स्पॅम लिंक प्रविष्ट करू नका. ConversionConversion EmoticonEmoticon