मुलांक ९ ची महत्त्वपुर्ण माहिती | Important Details of Birth No 9:
![]() |
मंगळ ग्रह | MARS |
मुलांक ९ असलेल्या कोणत्याही महिन्याच्या ९, १८ आणि २७ जन्म तारखांमध्ये जन्म झालेल्या सर्वच व्यक्ती मंगळ ग्रहाने
प्रभावित असतात. ९ नंबर मंगळ ग्रहाचा आहे
आणि कोणत्याही महिन्याच्या ९, १८ आणि २७ या तारखेला
जन्मलेल्या लोकांमध्ये या ग्रहाचे वैशिष्ट्य स्पष्टपणे दिसून येते.
मंगळ हा लाल रंगाचा आणि अतिशय विध्वंसक ग्रह आहे. हा बाहेरून गरम, अग्निमय, धगधगणारा आणि तापट आहे, पण आत बर्फ आहे. मंगळ ग्रहाला एक योद्धा म्हणून पाहिले जाते
आणि त्याला कमांडर इन चीफ म्हणून ओळखले
जाते. शौर्य आणि धैर्यासाठी मंगळ ग्रह प्रसिद्ध आहे. मंगळ ग्रहाचा अंमल असणारे लोक
धैर्यवान आहेत आणि त्यांच्यात प्रचंड ऊर्जा आहे. जर त्यांनी ही उर्जा योग्य दिशेने वापरली तर ते आयुष्यात
खूप यशस्वी होतात.
मुलांक ९ असलेल्या कोणत्याही महिन्याच्या ९ , १८ ,
२७ जन्म तारखांमध्ये जन्म झालेल्या व्यक्तींच्या
व्यतिमत्वात फरक दिसेल. ह्या व्यक्तींच्या गुणांमधील तीव्रता कमी-अधिक प्रमाणात
वेगळी असते. कारण जन्म दिनांक ९ , १८ आणि २७ चा मुलांक जरी ९ असला तरी यातला १८ आणि २७ ह्या दोन अंकी संख्येचे एक अंकी संख्येत
विभाजन झाले आहे.
थोडक्यात १८ जन्म तारीख असलेल्या व्यक्तींमध्ये १ (सुर्य) आणि ८ (शनि) ग्रहाचे
थोडेफार गुणधर्म दिसतील आणि २७ जन्म तारीख असलेल्या व्यक्तीमध्ये २ (चंद्र) आणि ७
(केतु) ग्रहाचे थोडेफार गुणधर्म दिसतील. परंतु १८
आणि २७ जन्म तारखेमध्ये, १८ हा अंक इतर ९ आणि २७ अंकाच्या तुलनेत खूप खडतर समजला
जातो. कारण सुर्याचा मुलगा शनि हा असला तरी त्यांच्या नातेसंबंधात असणाऱ्या
कटूपणामुळे अंक १८ ला वेगवेगळ्या अडचणीतून मार्ग काढावा लागतो, त्यांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागते.
पण यांचा भाग्यांक आणि नाव क्रमांक सुसंगत असेल तर त्यांना ते खूप लाभदायी
ठरते. हीच गोष्ट ९ आणि २७ जन्मतारखेला लागू होते.
२७ अंक चंद्र आणि केतुच्या युतीतून तयार झालेला कल्पकता आणि अंतर्ज्ञानाचे
मिश्रण असलेला मंगळाची प्रचंड ऊर्जा आणि गती देणारा असल्याने अशा व्यक्तीला जास्त
गतिमान करतो आणि त्याच्या कार्यात यश मिळवून देतो. थोडक्यात २७ अंक चंद्र आणि
केतुच्या संयोजनाने बनलेला एक पुरक अंक
आहे ज्याचा मंगळ ग्रह शासक आहे.
उदाहरण नितीन गडकरी यांचा जन्मदिनांक
२७ मे १९५७ आहे. अर्थात यात भाग्यांक आणि नाव क्रमांक
योग्य असतील तर त्याचे परिणाम अधिक चांगले असतात. जर ते पूरक नसतील तर यांचे
भवितव्य वादाच्या भोवऱ्यात अडकते. नेहमी काहीतरी वादंग निर्माण होतो. अंक २ आणि ९
परस्पर विरोधी आहेत. तसेच ७ आणि ९ देखील परस्पर विरोधी आहेत.
मुलांक ९ चे लोक कोणत्याही प्रकारच्या
खेळात उत्कृष्ट आहेत. तसेच, सामान्यतः असे पाहण्यात आले आहे की, इतर क्रमांकाच्या तुलनेत ९ नंबर चे लोक सर्वात जास्त सक्रिय असतात. ९ मध्ये
मंगळाची प्रचंड ऊर्जा असल्याने हे लोक शारीरिक खेळात जास्त प्रमाणात अग्रेसर
दिसतात.
नंबर ९ ही एक चांगली संख्या आहे मग तो मुलांक असो, भाग्यांक असो किंवा नाव क्रमांक असो. परंतु ९ क्रमांक फक्त या तीन संख्यांपैकी
एक असावा. उदाहरणार्थ, जर मुलांक किंवा भाग्यांक ९ असेल तर
नंबर ९ हा नावाचा नंबर असू नये. जर दोन्ही मुलांक आणि भाग्यांक ९ असेल; तर मात्र ९ क्रमांकाचे नाव कटाक्षाने टाळले पाहिजे. कारण वर म्हंटल्याप्रमाणे
नंबर ९ मध्ये प्रचंड ऊर्जा आहे आणि एकाचवेळी हे ९ नंबर तिन वेळा एकत्र आले तर ती
व्यक्ती कशी असेल... विस्फोटक, भयंकर तापट, अति- उत्साही, अति-प्रचंड ऊर्जा
असणारा.
यांच्या सततच्या धडपडया स्वभावामुळे, एका ठिकाणी
स्वस्थ न बसण्याच्या आणि खेळकर वृत्तीमुळे शरीराचे एखादे हाड मोडणे किंवा खरचटणे, छोट्या-मोठ्या इजा होणे आणि त्याची शरीरावर होणारी जन्मखूण बऱ्याचदा तुम्हाला
नंबर ९ च्या काही जणांमध्ये पहायला मिळेल.
मुलांक आणि भाग्यांक ९ असणारे लोक खूप अस्वस्थ आणि आक्रमक दिसतात. आता आपण
मुलांक ९ ची मुलभूत वैशिष्ट्ये पाहूया.
मुलांक ९ ची काही मुलभूत वैशिष्ट्ये पाहूया.
तापट स्वभावामुळे मुलांक ९ चे लोक
लवकर भडकतात. भाग्यांक आणि नाव क्रमांकानुसार त्यांच्या या तापट स्वभावात
फरक दिसेल म्हणजे एकतर तो चांगला असेल किंवा खूप वाईट. सामान्यत: असे दिसून आले आहे, जर मुलांक ९ चा भाग्यांक १ असेल तर हे एक चांगले एकीकरण आहे. कारण हे लोक त्यांच्या उर्जेला
त्यांच्या कार्यासाठी योग्य दिशेने वापरण्यात सक्षम असतात, याला नाव क्रमांक अपवाद आहे.
मुलांक ९ चे लोक कधीही वादविवाद
थांबवणार नाहीत. ते आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी आवाज उठवतात आणि बोलतात, प्रसंगी भांडणही करतात. याचे विपरीत
परिणाम कधी कधी त्यांना भोगावे लागतात.
मुलांक ९ चे लोक खूपच अस्वस्थ आहेत आणि ते स्वतःला काहीतरी किंवा इतर
कुठल्यातरी गोष्टीत व्यापून ठेवण्याचा प्रयन्त करतात. शांत बसणे त्यांच्यासाठी फार
कठीण आहे. तसेच मानसिक उत्तेजनाऐवजी शारीरिक व्यायामाच्या कामात ते अधिक चांगले
आहेत.
मुलांक ९ च्या लोकांच्या स्वभावात अस्थिरता असल्याने आणि एकंदरीत त्यांचा
स्वभाव तापट असल्याने ते जास्त काळ शांत राहू शकत नाहीत. जरी ते लोकांशी बोलत असले
तरीही त्यांच्या आवाजाचा स्वर अधिक असेल.
मुलांक ९ चे लोक दुसऱ्यां लोकांना मदत करतात, काही वेळा मदत करताना ते पक्षपातसुद्धा करतात, आपल्या जवळच्या लोकांना प्रमाणाबाहेर अनुकूलता दर्शवतात ज्यामुळे ते अडचणीत
येऊ शकतात.
जसे ते इतरांना मदत करतात तसेच जर त्यांनी ठरवले एखाद्याची वाट लावायची तर
तेसुद्धा मुलांक ९ चे लोक करतात, पण त्यांनी हे लक्षात
घ्यावे दुसऱ्याची वाट लावताना स्वतःचेही खूप मोठे नुकसान होऊ शकते. कधी कधी ते
नुकसान भरून न काढता येण्यासारखे असू शकते.
मुलांक ९ चे लोक अत्याधिक ऊर्जावान आहेत आणि इतर संख्येच्या तुलनेत हे लोक
सर्वात जास्त उत्साही आहेत. तसेच ते न थकता, न झोपता बराच वेळ
काम करू शकतात. पुरेशी झोप न घेतल्याने हे लोक अस्वस्थ होतात.
अख्या जगाला मुलांक ९ चे लोक खूप मजबूत आणि हट्टी दिसू शकतात. पण ते खरोखर खूप
मृदू आणि भावनिक लोक आहेत. अगदी मंगळ ग्रहासारखे बाहेरून अग्निमय आणि आतून बर्फ
आहेत.
मुलांक ९ लोकांची ही मुलभूत
वैशिष्ट्ये आहेत. परंतु कृपया लक्षात घ्या की ही वैशिष्ट्ये त्यांच्या नावाच्या
संख्येवर किंवा भाग्यांक संख्येनुसार सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतात. आता मुलांक
९ च्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू पाहूया.
मुलांक ९ ची सकारात्मक बाजू:
मुलांक ९ च्या लोकांकडे प्रचंड ऊर्जा आहे पण त्याचा योग्य वापर करणे हे
त्यांचे सर्वात मोठे आव्हान आहे. मुलांक ९ सोबत जर ६ नंबरचा नाव क्रमांक असेल तर
त्यांना बाहेरून शांत ठेवून त्यांची उर्जा योग्य दिशेने वापरण्यास त्यांना प्रवृत्त
करते. ते कठोर परिश्रम करतात आणि पुर्ण निर्धाराने कार्य करतात. कठोर परिश्रम आणि
दृढनिश्चय ही त्यांची सर्वात चांगली सकारात्मक गुणवत्ता आहे.
९ नंबर चे लोक धैर्यवान आणि साहसी आहेत. कधीकधी ते आपल्या आसपासच्या लोकांना
उत्कृष्ट प्रेरणा देतात आणि उत्कृष्ट
प्रेरक म्हणून कामसुद्धा करतात. जेव्हा
साहसी खेळांचा विचार केला जातो तेव्हा ते नेहमीच पुढाकार घेतात. ते शस्त्राशिवाय
त्यांच्या शत्रूंशी जाऊन युद्ध करू शकतात.
मुलांक ९ चे लोक उत्साहाने भरलेले आहेत आणि आशावादी आहेत. कधीकधी ते भावनिक होतात.
परंतु ते जगाला सहसा कधीच दिसून येत नाही.
थोडक्यात आपण मुलांक ९ च्या सकारात्मक
गुणांवरून निष्कर्ष काढला तर मुलांक ९ च्या लोकांमध्ये भरपूर उर्जा आहे आणि त्याला
योग्य दिशेने आणि कार्यक्षमतेने वापरणे हे सर्वात प्रभावी आव्हान त्यांच्यापुढे
आहे. सामान्यत: या ऊर्जेचा सर्वोत्तम वापर जे लोक खेळात कार्यक्षम आहेत ते लोक
करतात. पण हेच जर नकारात्मक असल्यास या लोकांच्या आजूबाजूच्या लोकांना यांचा त्रास
होऊ शकतो कारण आजूबाजूच्या लोकांना त्यांचे आक्रमण सहन करावे लागते.
मुलांक ९ ची नकारात्मक बाजू:
बऱ्याचदा असे पाहण्यात आले आहे की, नंबर ९ चे लोक
नेहमीच समस्या निर्माण करतात. मुलांक ९ आणि भाग्यांक ९ वाले किंवा नाव क्रमांक ९
चे लोक जास्त प्रमाणात अपघाताला बळी पडतात आणि आपले रक्त गमावतात. कारण यांना वेग
खूप आवडतो आणि हे लोक आपल्या वेगावर नियंत्रण ठेवत नाहीत.
मुलांक ९ च्या अस्थिर स्वभावामुळे इतरांना ते गर्विष्ठ आणि अहंकारी वाटतात. ते
नेहमी त्यांचा दृष्टिकोन कसा बरोबर आहे हे सांगण्याचा आणि पटवून देण्याचा
जबरदस्ती प्रयत्न करतात आणि कधीही ते आपली
बाजू सहज सोडत नाहीत. त्यांच्या तापाट स्वभावामुळे ते
खूप वाईट वागू शकतात.
कधी कधी मुलांक ९ च्या लोकांमध्ये अति आत्मविश्वास पहायला मिळतो. एखादी गोष्ट माहिती असो वा नसो किंवा आपल्याला
खात्री असो वा नसो याची पर्वा न करता ते नेहमीच प्रयत्न करतील आणि अति आत्मविश्वास
दाखवतील.
मुलांक ९ चे लोक आक्रमक प्रेमी असल्याचे दिसून येते. ते त्यांच्या जोडीदारांवर
शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या दबाव निर्माण करून त्यांच्याशी खूप आक्रमकपणे वागतात
म्हणून मुलांक ९ च्या जोडीदारांना त्यांच्याशी संघर्ष करावा लागतो.
मुलांक ९ च्या लोकांना गोष्टी त्यांच्या मनासारख्या व्हाव्यात अशी त्यांची
इच्छा असते आणि जर तसे झाले नाही तर ते भांडणे सुरू करतात आणि आजूबाजूच्या लोकांना
यामुळे त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे लोकांना हे भांडखोर वाटतात.
थोडक्यात सांगायचे झाले तर मुलांक ९ च्या लोकांनी मृदूपणे बोलण्याचा प्रयन्त
केला आणि आपल्या तापट स्वभावाला नियंत्रणात ठेवले तर त्यांच्यात असणाऱ्या प्रचंड
उर्जेला योग्य मार्गाने आणि योग्य ठिकाणी वापरायला वाव मिळेल.
मुलांक ९ ने घ्यायची खबरदारी आणि सुचना:
आपल्या तापट स्वभावावर नियंत्रण ठेवा.
धीर धरण्याचा प्रयत्न करा. संयमाने वागा.
वादविवाद टाळा. अनावश्यक मारामारी आणि भांडणे टाळा.
अधिक मेहनत घेण्यापेक्षा हुशारीने काम करण्याचा प्रयत्न करा.
कृपया टिप्पणी बॉक्समध्ये कोणताही स्पॅम लिंक प्रविष्ट करू नका. ConversionConversion EmoticonEmoticon