जन्मदिनांक ८, १७, २६ असणाऱ्या मुलांक ८ चे अंकशास्त्र | Numerology of Birth Number 8, 17, 26

मुलांक ची महत्त्वपुर्ण माहिती | Important Details of Birth No 8:

शनि ग्रह | SATURN

शनि ग्रह | SATURN
 



    मुलांक  असलेल्या कोणत्याही महिन्याच्या ८, १७  आणि २६ जन्म तारखांमध्ये जन्म झालेल्या सर्वच व्यक्ती शनि ग्रहाने प्रभावित असतात. अंक हा शनिचा  आहे आणि कोणत्याही महिन्याच्या ८, १७  आणि २६ या तारखेला जन्मलेल्या लोकांमध्ये या ग्रहाचे वैशिष्ट्य स्पष्टपणे दिसून येते. बृहस्पति ग्रहानंतर केवळ शनि ग्रहातच एखाद्याला त्याच्या आयुष्यात उत्कृष्ट उंचीवर नेण्याची क्षमता आहे.

    शनि हा सुर्याचा मुलगा आहे. प्रचंड उर्जा आणि उष्मामुळे होणारा दाह सुर्याच्या पत्नीला सहन होत नव्हता. कोणालाही सुर्याची इतकी शक्ती किंवा उष्णता सहन करणे शक्य नव्हते. सुर्याची पत्नी संध्या हुशार असल्याने तिने आपली सावलीरूपी प्रत तयार केली, जिचे नाव छाया. या छायाला सुर्यलोकात ठेवून सुर्याची उष्णता सहन करता यावी म्हणून संध्या कठोर तपस्या करण्यासाठी निघून जाते.

    सुर्याला याची कल्पना नसल्याने ते छायाला आपली पत्नी समजून तिच्यासोबत राहतात. काही वर्षांनी छायाने शनिला जन्म दिला. छाया ही संध्याची प्रतिमा (सावलीरूपी प्रतिबिंब) असल्याने आणि सुर्याची मुळ पत्नी नसल्यामुळे,  शनि  गडद आणि लाल डोळ्यामुळे कुरुप दिसत होते. सुरुवातीला शनिला पाहिल्यानंतर छायाला आपली पत्नी संध्या समजून सुर्य तिच्या चारित्र्यावर संशय घेतात, त्याचवेळी शनि आपले वडिल सुर्याला ग्रहण लावतो  आणि सुर्य  देव भडकतात.  

    आता सुर्याच्या प्रकोपातुन वाचवण्यासाठी छाया आपल्या मुलाला जिथे सुर्याची किरणे पोहचणार नाही अशा ठिकाणी घेऊन जाते. कालांतराने सुर्याला खरे काय घडले होते ते कळते पण तरीही त्या घटनेनंतर शनि सुर्याचा कटू शत्रू झाला.

    शनि हा अंधाराचा ग्रह आहे याचे एक कारण सुर्याच्या प्रकोपातून वाचवण्यासाठी छायाने शनिला अंधारात नेले, जिथे सुर्याची किरणे पोहचू शकणार नाहीत अशा ठिकाणी शनिला घेऊन जाते.  शनि हा विश्वातील सर्वात हळू ग्रह आहे आणि तो त्याचे परिणाम अत्यंत मंदपणे देतो. ८, १७  आणि २६ रोजी जन्मलेल्या लोकांचा सर्वोत्तम काळ वयाच्या ३५ वर्षानंतरचा आहे. अर्थात याला अपवाद देखील आहेत.

    शनि हा शिस्तीचा ग्रह म्हणून ओळखला जातो. शनि अहंकार असलेल्या आणि बेकायदेशीर कामात गुंतलेल्या लोकांना चांगले परिणाम देत नाही, वाईट कृत्य करणाऱ्याला त्याच्या कर्मानुसार तो त्याचे फलित देतो. याचमुळे शनिला कर्मफलदाता आणि दंडनायक म्हणून सुद्धा ओळखले जाते. शनि प्रत्येकाला त्याचे फळ विलंबाने देतो आणि तसेच तो अडथळ्यांचा ग्रह आहे. शनि आपल्या जीवनात अडथळे निर्माण करतो.

    मुलांक ८ असलेल्या कोणत्याही महिन्याच्या ८, १७ आणि  २६ जन्म तारखांमध्ये जन्म झालेल्या व्यक्तींच्या व्यतिमत्वात फरक दिसेल. ह्या व्यक्तींच्या गुणांमधील तीव्रता कमी-अधिक प्रमाणात वेगळी असते. कारण जन्म दिनांक  , १७ आणि  २६ चा मुलांक जरी ८ असला तरी यातला १७ आणि २६ ह्या दोन अंकी संख्येचे एक अंकी संख्येत विभाजन झाले आहे.

    थोडक्यात १७ जन्म तारीख असलेल्या व्यक्तींमध्ये १ (सुर्य) आणि ७ (केतु) ग्रहाचे थोडेफार गुणधर्म दिसतील आणि २६ जन्म तारीख असलेल्या व्यक्तीमध्ये २ (चंद्र) आणि ६ (शुक्र) ग्रहाचे थोडेफार गुणधर्म दिसतील. परंतु १७ जन्म तारखेच्या लोकांकडे  उत्कृष्ट नेतृत्व आणि जगण्याची कौशल्ये  असतात. क्रमांक १ हा आध्यात्मिक बुद्धिमत्तेशी देखील जोडला गेला आहे आणि आध्यात्मिक आत्मज्ञानाची आवड जागृत करण्याचा प्रयत्न करणार्‍या लोकांसाठी हे चांगले आहे.

    १७ जन्म दिनांक असणाऱ्यांना परदेश गमन करायला मिळते आणि ते बरेच देश फिरतात. तसे २६ आणि ८ ही परदेश गमन करतात पण जन्म दिनांक १७ चे प्रमाण जास्त आहे. जन्म दिनांक  , १७ आणि  २६ जास्त फिरतात मग ते देशांतर्गत असो किंवा परदेश गमन.  तसेच ८ आणि २६ पेक्षा जन्म दिनांक १७ चे लोक जास्त खुनशी आहेत. कधी कोणाचा कसा काटा काढतील किंवा बदला घेतील हे सांगता येणार नाही.

    अंक २६ ला काही प्रमाणात अपशकुनी मानतात कारण बऱ्याचशा कटू गोष्टी याच तारखेला घडलेल्या आहेत. गुजरातमध्ये २६ जानेवारी २००१ रोजी भूकंप झाला होता, २६ डिसेंबर २००४ रोजी त्सुनामीने भारतात बऱ्याच ठिकाणी थैमान घातले, २६ मे २००७ रोजी गुवाहाटीमध्ये स्फोट झाले होते, २६/११ चा २००८ ला मुंबईला दहशदवादी हल्ला झाला होता आणि त्याच दिवशी झालेला अहमदाबाद स्फोट. २६ जुलै २००५ ला पावसाने दिलेल्या तडाख्याने महाराष्ट्रासह मुंबई शहरात पूराने मोठा हाहाकार माजवला होता; ज्याच्यामुळे कित्येक लोक, जनावरे मेली, कित्येक घरे उध्वस्थ झाले. दैनंदिन जनजीवन विष्कळीत झाले आणि आपली यंत्रणा ही कोलमडली.

    तसेच अजूनही काही उदाहरणे आहेत. 

    जपान भूकंप: २६ फेब्रुवारी २०१०

    बाम, इराणचा भूकंप: २६ डिसेंबर २००३

    पोर्तुगाल भूकंप: २६ जानेवारी १९५१

    कानसु, चीनचा भूकंप: २६ डिसेंबर १९३२

    क्राकाटाउ ज्वालामुखीचा उद्रेक: २६ ऑगस्ट १८८३

    पण शनिमुळे या सर्व संकटांवर मात करून पुन्हा नव्या दमाने उभे राहण्याची जिद्द ही अंक २६ आणि १७, ८ मध्ये आहे.

    मुलांक  ८ ची काही मुलभूत वैशिष्ट्ये पाहूया.

    ८ या अंकाला संख्याशास्त्रात संघर्षाचा अंक, विलंब आणि अडथळे निर्माण करणारा अंक म्हणून ओळखले जाते, मुलांक ८ च्या लोकांची ही सर्वात वाईट गुणवत्ता आहे ज्याच्यापासून दूर जाणे कठीण आहे. काही मोजके लोक याला  अपवादात्मक आहेत. 

    सतत कठोर परिश्रम करणे आणि भरपूर मेहनत करणे ही  मुलांक ८ ची सर्वोत्कृष्ट गुणवत्ता आहे. शनि त्यांच्या आयुष्यात उशीरा निकाल देतो. परंतु अशा लोकांना तो  उर्जा देतो ज्यामुळे त्यांना कठोर परिश्रम करावे लागतात. मुलांक ८ च्या लोकांना निराश वाटू लागते, ते खूप वैतागतात पण ते कधीही आपल्या आशा सोडत नाहीत. ते आपल्या आशा नेहमी पल्लवित ठेवण्याचा प्रयन्त करतात. मुलांक  २ सारखे नंबर ८ चे मूड सतत बदलत नाहीत, उलट त्यांचे मूड स्थिर आहेत.

    मुलांक ८ चे लोक हळू आणि स्थिर आहेत. तसेच, ते कोणतीही आव्हाने सहजपणे स्वीकारतात.  आयुष्यात बर्‍याच गोष्टींमध्ये आव्हानांना तोंड देण्यास ते घाबरत नाहीत.

    मुलांक ८ चे लोक बर्‍याचदा आपल्या अंतर्गत भावना इतर लोकांपुढे व्यक्त करत नाहीत किंवा त्या लोकांमध्ये सामायिक करत नाहीत. जरी त्या गोष्टीमुळे त्यांना त्रास होत असला तरीसुद्धा ते त्या गोष्टी स्वत: कडे ठेवण्यास प्राधान्य देतात. अशा गोष्टी फक्त त्यांच्या अगदी जवळ असलेल्या लोकांसमोरच ते व्यक्त करतात.

    आयुष्यात येणाऱ्या अडचणींमुळे आणि सततच्या परीक्षांमुळे, ८ क्रमांकाचे लोक आपल्या भावना राखीव ठेवतात, ते  मनमोकळेपणाने वागत नाहीत. ते 

    स्व-केंद्रितही आहेत. तसेच, विलंब आणि अडथळे हे त्यांच्या जीवनाचा एक भाग असल्याने ते खूप धीर धरतात आणि संयमाने वागतात.

    मुलांक ८ चे लोक वर उल्लेख केल्याप्रमाणे त्यांच्या आयुष्यात कधीही आशा गमावत नाहीत ज्यामुळे ते आपल्या आयुष्यात नेहमी काही ना काही करत पुढे वाटचाल करत असतात. ते सतत अपयशाला सामोरे जातात, तथापि त्यांच्या दृढ आणि प्रबळ इच्छाशक्तीमुळे ते सर्व अपयशांवर मात करण्यास सक्षम असतात आणि ते भावनिकदृष्ट्या बळकट होतात.

    वर नमूद केलेली मुलांक ८ च्या लोकांची मुलभूत वैशिष्ट्ये आहेत. परंतु कृपया लक्षात घ्या की ही वैशिष्ट्ये त्यांच्या नावाच्या अंकावर किंवा भाग्यांकानुसार सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतात. आता आपण त्यांच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजूवर चर्चा करूया.

    मुलांक ८ ची सकारात्मक बाजू:

    वर चर्चा केल्याप्रमाणे, मुलांक ८ च्या लोकांमध्ये दृढ इच्छाशक्ती आणि दृढनिश्चय आहे. ज्यामुळे ते बरेच विलंब, अडथळे आणि अपयश आले तरी आपले कार्य पूर्ण करून पुढे जातात.

    मुलांक ८ चे लोक हळू आणि धीमे आहेत. ते विचार न करता निर्णय घेत नाहीत आणि सामान्यत: नियोजित मार्गाने त्यांचे जीवन जगतात. तसेच हे  लोक खूप कठोर परिश्रम करतात. कष्टकरी कामासाठी आणि अंगमेहनत करण्यासाठी ते सर्वोत्तम आहेत.

    शक्यतो मुलांक ८ चे लोक पराभव स्वीकारताना दिसत नाहीत. जोपर्यंत त्यांना योग्य वाटत नाही तोपर्यंत ते लढाई सुरू ठेवतात आणि सहज पराभव स्वीकारत नाहीत. ते प्रयत्नशील राहतात आणि ते एक महान लढाऊ आहेत.

    साधेपणा, विनम्रता आणि नेहमी जमिनीवर राहण्याचा स्वभाव (ज्याला आपण इंग्रजीत डाऊन टू अर्थ असे म्हणतो) असल्यामुळे मुलांक ८ चे बरेचसे लोक यशाच्या शिखरावर पोहोचतात. परंतु तरीही त्यांना स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल गर्विष्ठ आणि अभिमान वाटत नाही.

    मुलांक ८ ची नकारात्मक बाजू:

    मुलांक ८ चे सर्वात वाईट वैशिष्ट्य, जर ते बेकायदेशीर कामात अडकले तर त्यांना आयुष्यात कधीही यश मिळणार नाही. शनि हा न्यायाचा ग्रह आहे आणि मुलांक  ८ च्या लोकांनी जर बेकायदेशीर कृती केल्या तर तो लोकांना क्षमा करत नाही. शनिला प्रामाणिकपणा आवडतो त्यामुळे यशस्वी होण्यासाठी मुलांक  ८ ला प्रामाणिक असणे आणि स्वार्थी हेतू नसणे महत्त्वाचे आहे.

    जीवनात अनेक अपयश आल्यामुळे अनेकदा मुलांक ८ च्या लोकांना वाईट सवयीचे व्यसन लागते आणि ते ड्रग्ज आणि अल्कोहोलच्या आहारी जातात. यातले काही जण असे ही आहेत जे मजेसाठी, काही मनावरचा ताण कमी करण्यासाठी दारूचे सेवन करतात.

    प्रेम आणि नातेसंबंधात मुलांक ८ ला अपयश मिळते, खासकरून महिलांना. ८ अंकाच्या बहुतेक स्त्रियांच्या वैवाहिक जीवनात समस्या आहेत. त्यांनी घाईघाईत निर्णय घेऊन नात्यात अडकू नये. त्यांचा सहसा विजातीय लिंगाद्वारे उपयोग होतो आणि ते अडचणीत सापडतात.

    मुलांक ८ चे लोक दुर्दैवी असल्याने त्यांची वारंवार फसवणूक होते. ते खुनशी आहेत आणि  जर त्यांची फसवणूक केली गेली तर ते त्या व्यक्तीला सहज माफ करत नाहीत आणि त्या व्यक्तीचा सूड घेण्याचा विचार करण्यात आपला वेळ वाया घालवतात. अर्थात याला काही भाग्यांक आणि नाव क्रमांक अपवाद असू शकतात.  

    नंबर ४ प्रमाणे, ८ नंबरच्या लोकांना आयुष्यात बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागतो. शनि परिणाम देण्यास धीमा आहे म्हणून सामान्यतः वयाच्या पस्तीशीनंतर (३५ व्या वयोगटानंतर) मुलांक ८ चे लोक उत्कृष्ट आयुष्य जगतात.

    मुलांक ने घ्यायची खबरदारी आणि सुचना:

    कधीही कोणतेही बेकायदेशीर कार्य करू नका.

    मुलांक ८ च्या  महिलांनी त्यांचे भागीदार काळजीपूर्वक निवडले पाहिजेत.

    वयाच्या ३५ व्या वर्षापर्यंत जास्त जोखमीच्या धोक्याचे काम करू नका. जर तुम्ही तसे केले तर ज्योतिषी किंवा अंकशास्त्रज्ञाचा सल्ला घ्या.

    मुलांक ८ ने त्यांच्या प्रत्येक गोष्टीत नेहमी क्रमांक ४ आणि ८ टाळावे.

    ४ आणि ८  क्रमांकासोबत भागीदारी किंवा लग्न करू नका.

    Previous
    Next Post »

    कृपया टिप्पणी बॉक्समध्ये कोणताही स्पॅम लिंक प्रविष्ट करू नका. ConversionConversion EmoticonEmoticon