जन्मदिनांक ६, १५, २४ असणाऱ्या मुलांक ६ चे अंकशास्त्र | Numerology of Birth Number 6, 15, 24

मुलांक ची महत्त्वपुर्ण माहिती | Important Details of Birth No 6:

शुक्र ग्रह | VENUS

शुक्र ग्रह | VENUS 



    मुलांक ६ असलेल्या कोणत्याही महिन्याच्या ६, १५ आणि २४ जन्म तारखांमध्ये जन्म झालेल्या सर्वच व्यक्ती शुक्र ग्रहाने प्रभावित असतात. ६ नंबरचा शासक ग्रह शुक्र आहे आणि कोणत्याही महिन्याच्या ६, १५ आणि २४ या तारखेला जन्मलेल्या लोकांमध्ये या ग्रहाचे वैशिष्ट्य स्पष्टपणे दिसून येते.

    शुक्र ग्रहाला प्रेम आणि शांतीचा ग्रह म्हणून ओळखले जाते. तसेच तो देवविरोधीचा (असुरांचा) गुरू आहे. शुक्राचार्यांना (शुक्र) देवांचा गुरु व्हायचे होते पण बृहस्पतिना (गुरु) ना देवांचा गुरु घोषित केले, मग शुक्राचार्यांना असुरांचा गुरु व्हावे लागले. खर तर शुक्राचार्य हे बृहस्पति इतकेच ज्ञानी, बुद्धिमान आणि हुशार आहेत, पण तरी ही त्यांना देवतांचे गुरुपद दिले गेले नाही आणि त्यांची प्रचंड निराशा झाली. म्हणूनच शुक्र आणि गुरु एकमेकांचे कट्टर विरोधी आहेत.     

    शुक्र म्हणजे मानवी स्वभावाची संवेदनशील बाजू आहे आणि विलासी जीवनाची ओढ निर्माण करणारा किंबहुना ऐशो-आरामाचे जीवन प्रदान करणारा एक निसर्गरम्य, लाभदायक ग्रह आहे. आणि  म्हणूनच व्हीनसच्या (शुक्र ग्रहाच्या) तारखेला जन्मलेल्या किंवा ज्योतिषशास्त्राप्रमाणे ज्यांच्या जन्मकुंडल्यांमध्ये ठराविक स्थानात शुक्राचे स्थान बळकट असेल तर त्या व्यक्तीचा  स्वभाव कलात्मक असतो, तो खूप उत्कट आणि कामुक असतो.

    करमणूक अथवा  मनोरंजन उद्योगात लोकप्रिय होण्यासाठी एखाद्याकडे एक मजबूत व्हीनस (शुक्र) असावा लागतो. सामान्यत: सर्व सेलिब्रेटींच्या जन्मकुंडलीमध्ये किंवा त्यांच्या न्यूमरोलॉजीमध्ये  ६ क्रमांकाद्वारे राज्य करणारा मजबूत शुक्र आहे. आता आपण मुलांक ६ ची मुलभूत वैशिष्ट्ये पाहूया.

    नंबरची काही मुलभूत वैशिष्ट्ये पाहूया.

    ६ मुलांकाचे लोक स्वभावाने अत्यंत रोमँटिक म्हणजेच प्रणयरम्य असतात. फरक फक्त एवढाच असतो, काही जण ते उघडपणे दर्शवतात आणि काही जण तसे करत नाहीत. त्यांची ही गुणवत्ता त्यांच्या भाग्यांक संख्येवरसुद्धा अवलंबून आहे, त्याच्यावरूनच  ही गुणवत्ता जगाला दृश्यमान होते किंवा नाही होत.  

    मुलांक ६ च्या लोकांमध्ये काही विशिष्ट इश्कबाजी, प्रेमाचे ढोंग करणारी (flirtish) प्रवृत्ती असतात, पुरुष असो वा महिला; त्यांच्या आयुष्यात त्यांचे एकापेक्षा जास्त संबंध असल्याचे दिसून येते. अतिरिक्त वैवाहिक जीवन देखील त्यांच्या आयुष्यात आहे.

    हे लोक अत्यंत भावनिक असतात आणि फार लवकर लोकांशी भावनिक होतात, ज्यामुळे ते वारंवार दुखावले जातात. जेव्हा ते नातेसंबंधात असतात तेव्हा ते त्यांच्या भागीदारांशी मानसिक आणि भावनिकरित्या खूप जवळ येतात परंतु हे जास्त काळ टिकत नाही कारण बहुतेकवेळा  नंबर ६ चे लोक लगेच प्रेमात कंटाळतात.

    मुलांक ६ चे लोक फक्त सुंदर असलेल्या सर्व गोष्टींवर प्रेम करतात, मग ती चांगली चित्रकला असो, महागडे घड्याळ असो, भव्यदिव्य महल असो, ब्रँडेड कार असो, अतिशय सुंदर-निसर्गरम्य ठिकाण किंवा एखादी सुंदर जागा असो.

    मुलांक ६ असलेल्या कोणत्याही महिन्याच्या ६, १५, २४ जन्म तारखांमध्ये जन्म झालेल्या व्यक्तींच्या व्यतिमत्वात फरक दिसेल. ह्या व्यक्तींच्या गुणांमधील तीव्रता कमी-अधिक प्रमाणात वेगळी असते. कारण जन्म दिनांक  , १५ आणि २४ चा मुलांक जरी ६ असला तरी यातला १५ आणि २४ ह्या दोन अंकी संख्येचे एक अंकी संख्येत विभाजन झाले आहे.

    थोडक्यात १५ जन्म तारीख असलेल्या व्यक्तींमध्ये १ (सुर्य) आणि ५ (बुध) ग्रहाचे थोडेफार गुणधर्म दिसतील आणि २४ जन्म तारीख असलेल्या व्यक्तीमध्ये २ (चंद्र) आणि ४ (राहू) ग्रहाचे थोडेफार गुणधर्म दिसतील. परंतु १५ आणि २४ जन्म तारखेमध्ये, १५ अंक हा २४ अंकापेक्षा जास्त मजबूत असला तरी २४ हा अंक जास्त प्रसिद्धी झोतात येतो. किर्ती, प्रसिद्धी मिळण्यात हा अंक जास्त पुढे आहे.

    नाव क्रमांक आणि भाग्यांक जर मुलांक ६ ला सुसंगत नसेल तर जन्म दिनांक ६ आणि २४ मद्यपान करणारे, एकापेक्षा जास्त विजातीय व्यक्तींशी उत्कट संबंध ठेवतात. यात ६ नंबर जास्त प्रमाणात व्यसन करणारे किंवा मद्यपान करणारे दिसतील तर याच्या उलट २४ अंक चंद्र आणि राहूच्या युतीतून तयार झालेला चंचल आणि  धुर्तपणाचे मिश्रण असलेला प्रेमाचा उत्कट भाव असणारा एकापेक्षा जास्त व्यक्तीशी जास्त प्रमाणात घनिस्ट नातेसंबंध निर्माण करतो.

    याला १५ अंक सुर्याच्या कठोर नियमांनी आणि बुधाच्या निर्मळतेने शुक्राच्या संख्येत तयार झालेला अपवाद ठरतो पण काहीवेळा आपल्या जवळच्या व्यक्तीला टोचून बोलण्यात किंवा आपल्या जोडीदारासोबत गोड नातेसंबंध जपण्यात अयशस्वी ठरतो. 

    काही वेळा असे ही निदर्शनास आले आहे की जन्म दिनांक ६ च्या लोकांना फार लवकर त्यांच्या वडिलांना किंवा त्यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला गमवावे लागते, अर्थात जर त्यांचा भाग्यांक आणि नाव क्रमांक साजेसा नसेल तर.  

    ६ नंबर चे लोक सर्जनशील (क्रिएटिव्ह) आणि करमणूक करणारे (एंटरटेनर्स) आहेत. ते आनंदी जीवन जगणारे थोडक्यात हॅपी गो लकी असतात,  ते प्रफुल्लित आणि नेहमीच चैतन्यशील, उत्साही आणि तरूण असतात. त्यांना नेहमीच तरूण वाटतं. वयाच्या सत्तरीत ही ते मनाने तितकेच तरुण असतात. कित्येक जण पन्नाशी-साठी ओलांडली तरीही ते चिरतरुण दिसतात.

    मुलांक ६ आणि भाग्यांक २ आणि ७ चे लोक नेहमी वेगळा आणि विलक्षण विचार करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक समस्येसाठी ते एक नाविन्यपूर्ण उपाय घेऊन येतात. त्यांच्या या नाविन्यपूर्ण शोधक वृत्तीमुळे कोणत्याही समस्येसाठी जगावेगळे उपाय शोधण्याचे कसब त्यांच्याकडे आहेत आणि म्हणूनच त्याची विचार करण्याची पद्धत वेगळी (आऊट ऑफ द बॉक्स) असते.

    ६ क्रमांकाच्या लोकांना चैनीच्या वस्तू,  उत्कृष्ट आणि चांगल्या गोष्टी आवडतात. त्यांना महागडे कपडे आणि उपकरणे परिधान करणे, तसेच खूप जास्त खर्च करणे आवडते. त्यापैकी बहुतेकांना पार्टी करणे आणि मद्यपान करायला देखील आवडते. वर उल्लेख केल्याप्रमाणे ६, १५ आणि २४ जन्म दिनांक असणाऱ्या प्रत्येक व्यक्तींच्या गुणांची तीव्रता त्यांच्या भाग्यांक आणि नाव क्रमांकानुसार वेगळी आहे. 

    मुलांक ६ च्या लोकांना वलयांकित जीवन जगायला आवडते. उंच दर्जाच्या गोष्टी वापरायला यांना आवडते. जसे वर उल्लेख केल्याप्रमाणे त्यांना मौल्यवान वस्तू, चैनीची महागडी उपकरणे, सुगंधी द्रव्ये, आधुनिक साधन-सामुग्री आवडतात. तसेच त्यांना भटकंती करायला, निसर्गरम्य ठिकाणी फिरायला, समुद्र किनारी फेरफटका मारायला, बीचवर मजा करायला, वेगवेगळ्या पर्यटन स्थळी फिरायला अगदी परदेशातच नाही तर आपल्या देशातल्या विविध ठिकाणी भेट द्यायला आवडते. जर मुलांक ६ ची महिला असेल तर ती सुंदर असतेच पण त्यांना स्वतःला फिट ठेवायला, सुंदर दिसायला आवडते, तसेच त्यांना उंच प्रतीची सौंदर्य प्रसाधने वापरायला आवडते.  

    शुक्र सहजपणे विजातीय व्यतीस आकर्षित करते म्हणून संख्या ६ च्या लोकांमध्ये चुंबकीय व्यक्तिमत्व असते. त्यांच्याभोवती नेहमीच लोकांचा गराडा असतो आणि सामान्यत: ते त्यांच्या गटात प्रसिद्ध असतात. जसे नंबर ५ हे युनिव्हर्सल फ्रेंड (universal friend) आहे तसे नंबर ६ ला युनिव्हर्सल लव्हर (universal lover) म्हणून ओळखले जाते. 

    क्रमांक ६ ही जबाबदार आणि विश्वासार्ह संख्या आहे. ते उत्कृष्ट व्यवस्थापक बनवतात आणि एकावेळी अनेक कामे करण्यात कुशल आणि खुप चांगले असतात. ते कार्ये सहजपणे व्यवस्थापित करण्यास सक्षम असतात आणि विश्वासार्ह असतात. महिला असल्यास, ते उत्कृष्ट होममेकर बनवतात आणि त्यांचे घर आणि कुटुंबाचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करतात. तसेच, मुलांक ६ चे लोक अगदी सहजपणे कोणत्याही कठीण परिस्थितीतून बाहेर पडतात.

    क्रमांक ६ लोकांची ही मुलभूत वैशिष्ट्ये आहेत. परंतु कृपया लक्षात घ्या की ही वैशिष्ट्ये त्यांच्या नावाच्या संख्येवर किंवा भाग्यांक संख्येनुसार सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतात. आता मुलांक ६ चे सकारात्मक आणि नकारात्मक बाजू पाहूया.

    मुलांक ६ ची सकारात्मक बाजू:

    आधी म्हंटल्याप्रमाणे  ६ नंबर चे लोक नेहमीच तरूण राहतात. त्यांच्याकडे हॅपी गो लकी वृत्ती आहे. जी त्यांना उत्साही, चैतन्यशील बनवते आणि आसपासच्या लोकांना आकर्षित करते. एकावेळी अनेक कामे करण्याची हातोटी त्यांच्यात असते.

    साधारणपणे ६ नंबर चे लोक त्यांच्या देखभालीसाठी चांगली रक्कम खर्च करतात. ते एक चांगले व्यक्तिमत्व टिकवून ठेवतात आणि स्वत: ला खूप चांगले ठेवतात.

    मुलांक ६ चे लोक प्रेम करण्यात कुशल आहेत. त्यांच्या मोहक व्यक्तिमत्त्वामुळे आणि चैतन्यशील वृत्तीमुळे विजातीय  व्यक्ती त्यांच्या प्रेमात सहज पडते.

    मुलांक ६ कला क्षेत्रात उत्कृष्ट काम करते. ते उत्तमरीत्या मनोरंजन करणारे आहेत. तसेच ते उत्कृष्ट कलाकार बनतात. जगातील सर्वोत्तम मनोरंजन करणार्‍यांपैकी काहींवर ६ अंकाचा अंमल असतो.

    मुलांक ६ चे लोक काही सेकंदातच कोणत्याही गटात सामील होऊ शकतात, त्यांची इतरांशी मैत्रीसुद्धा पटकन होऊ शकते कारण ते लोकांमध्ये सहज मिसळतात, जरी त्या गटाचा कदाचित ते भाग नसतील किंवा त्यात पूर्णपणे सक्रिय नसतील  पण तरीही वेगवेगळ्या गटात ते चटकन मिसळतात. कधी कधी यांचा पर्यटन भ्रमती करण्याचा गट वेगळा असेल, मद्यपान करण्याचा गट वेगळा, पार्टी करण्याचा, फिल्म बघण्याचा गट वेगळा... असे वेगवेगळ्या गटात ते दिसतील. आणि म्हणूनच यांना युनिव्हर्सल फ्रेंड्स ही म्हटले जाते.

    मुलांक ६ ची नकारात्मक बाजू:

    मुलांक ६ चे लोक कधीकधी खूप आळशी असतात आणि त्यांच्यात उर्जा नसते. हे त्यांच्या खाण्यापिण्याच्या वाईट सवयींमुळे देखील होते.

    ६ नंबर चे वादविदात किंवा चर्चासत्रात आपली बाजू सहज सोडत नाही. त्यांचा विजय होईपर्यंत ते त्यांचा मुद्दा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात. वादविवादात ते सर्वात कट्टर विरोधी असू शकतात.

    काही वेळा ते खूप भावनिक आणि हक्क गाजवणारे (पझेसिव्ह) असतात. ते त्यांच्या भागीदारांवर सहज विश्वास ठेवत नाही; दुसरीकडे त्यांचे भागीदार त्यांच्यावर विसंबून रहावेत अशी त्यांची इच्छा असते.

    मुलांक  ६ चे लोक सामान्यत: त्यांच्या जीवनात एकापेक्षा जास्त नातेसंबंध जोडलेले पाहिले जातात. लग्नानंतरही ते घनिष्ठ नातेसंबंधात अडकतात. त्यांना कदाचित त्यांच्या कुटुंबावर प्रेम असेल, परंतु ते प्रेम करण्यात कुशल असल्याने, लग्नाच्या बाहेरील जिव्हाळ्याच्या नात्यात गुंतणे त्यांना थांबवता येत नाही.

    जर मुलांक ६ हा कमकुवत भाग्यांक किंवा नाव क्रमांकाशी संबंधित असेल तर ते सहजपणे दारू, सिगारेट आणि ड्रग्सचे व्यसन करतात किंवा त्याच्या आहारी जातात.

    मुलांक ६ चे लोक जेव्हा सकारात्मक असतात तेव्हा ते त्यांच्या क्षेत्रात सहज चमकतात. ६ द्वारे राज्य केलेले लोक चैतन्यशील, रोमँटिक, जबाबदार आणि जे काही करतात त्यामध्ये उत्साही असतात. पण प्रत्येक संख्येप्रमाणेच यातही वर नमूद केलेल्या काही नकारात्मक बाजू आहेत.

    मुलांक ने घ्यायची खबरदारी आणि सुचना:

    आळशी बनू नका.

    कुठल्याही गोष्टींबद्दल उत्कट, अतीउत्सुक बनू नका.

    आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा आणि व्यावहारिक व्हा.

    प्रमाणापेक्षा जास्त मद्यपान करू नका किंबहुना असली व्यसने टाळा. 

    आपला अतीरोमँटिक स्वभाव नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा किंबहुना प्रेमाचे ढोंग करणे, एकापेक्षा जास्त लोकांशी उत्कट आणि जिव्हाळ्याचे अनैतिक संबंध टाळा. 

    Previous
    Next Post »

    कृपया टिप्पणी बॉक्समध्ये कोणताही स्पॅम लिंक प्रविष्ट करू नका. ConversionConversion EmoticonEmoticon