जन्मदिनांक ५, १४, २३ असणाऱ्या मुलांक ५ चे अंकशास्त्र | Numerology of Birth Number 5, 14, 23

मुलांक ५ ची महत्त्वपुर्ण माहिती | Important Details of Birth No 5:

बुध । MERCURY
बुध । MERCURY   मुलांक ५ असलेल्या कोणत्याही महिन्याच्या ५१४२३ जन्म तारखांमध्ये जन्म झालेल्या सर्वच व्यक्ती बुध ग्रहाने प्रभावित असतात. बुधाचा अंक ५ आहे.

  बुध हा ग्रह चंद्र आणि गुरू ग्रहाची पत्नी यांचा मुलगा आहे. मुलांक ३ बद्दल सांगताना मी मागे याचा उल्लेख केला आहे. चंद्र गुरुच्या पत्नीशी कसा पळून गेला आणि त्यांना बुध नावाचा मुलगा झालायाबद्दल चर्चा केली. म्हणूनच २ आणि ५ मध्ये वैर आहे.

  बुध हा मिश्रित स्वभाव आणि दुहेरी स्वभावाचा ग्रह आहे. असे म्हणतात की बुध जरी गुरू ग्रहाचा मुलगा नसला तरी व्यवहारज्ञान व बुद्धिमत्तेमुळे त्यांनी बुधला आपला मुलगा म्हणून स्वीकारले.

  बुध ग्रहाला सदाबहार हरित ग्रह म्हणून ओळखले जाते. तसेच तो  संवादाचा ग्रह म्हणूनही ओळखला जातो आणि या ग्रहाद्वारे शासित लोकांकडे संप्रेषणसंभाषण यासारख्या दळणवळणाची उत्तम कौशल्ये असतात.

  मुलांक ५ असलेल्या कोणत्याही महिन्याच्या ५१४२३ जन्म तारखांमध्ये जन्म झालेल्या व्यक्तींच्या गुणधर्मात फरक दिसेल. ह्या व्यक्तींच्या गुणांमधील तीव्रता  कमी-अधिक प्रमाणात वेगळी असते. कारण जन्म दिनांक ५१४२३ चा मुलांक जरी ५ असला तरी यातला  १४ आणि २३ ह्या दोन अंकी संख्येचे एक अंकी संख्येत विभाजन झाले आहे.

  थोडक्यात १४ जन्म तारीख असलेल्या व्यक्तींमध्ये १ (सुर्य) आणि ४ (राहू)  ग्रहाचे थोडेफार गुणधर्म दिसतील आणि २३ जन्म तारीख असलेल्या व्यक्तीमध्ये २ (चंद्र) आणि ३ (गुरु) ग्रहाचे थोडेफार गुणधर्म दिसतील. परंतु १४ आणि २३ जन्म तारखेमध्ये१४ अंक हा २३ अंकापेक्षा जास्त मजबूत आहे.    

  कारण १४ जन्म तारीख असलेल्या व्यक्तींमध्ये रवि (सुर्य) आपल्याला व्यवसाय करण्यासाठी पुढाकार देतो आणि राहू त्या व्यवसायाच्या रणनीतीसाठी ज्ञान प्राप्त करून देतो. त्यामुळे जन्म दिनांक १४ वाले जास्त करून तुम्हाला छोटा-मोठा उद्योगधंदा  किंवा मोठा व्यवसाय करणारे दिसतील.

  पण जन्म दिनांक १४ व्यवसाय मध्ये दिसत असेल तर २३ ५ वाले कमी नाहीत. २३ जन्म दिनांक ला नाव क्रमांक आणि भाग्यांक चांगला लाभला तर ते अतिशय उत्तम वक्त्तेपुढारी अथवा  नेते झालेले दिसतीलउदाहरण द्यायचे झाले तर माननीय बाळासाहेब ठाकरे (२३ जानेवारी १९२६ चा जन्म) आणि जन्म दिनांक ५ म्हणाल तर विराट कोहली (५ नोव्हेंबर १९८८ चा जन्म).     

  ५ नंबरची काही मुलभूत वैशिष्ट्ये पाहूया.

  ५ व्या क्रमांकाचे लोक बौद्धिक आणि जास्त वेगाने विचार करणारे आहेत. बर्‍याचदा प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे सेकंदात तयार असतील. परंतु त्यांच्या याच  वेगवान विचार करण्याच्या स्वभावामुळे त्यांचे मनही बर्‍याचदा बदलत असते.

  हे लोक खूप बडबडे (वार्तालाप करणारे) आहेत. समोरच्याला बोलत करण्यातआपली गोष्ट पटवून देण्यात यांचा हातखंडा असल्याने किंवा त्यात ते सराईत असल्याने ते विक्रीच्या कामासाठी परिपूर्ण आहेत. तसेच ते  उद्योगधंद्यात सुद्धा दिसतात.   

  क्रिएटिव्हिटी म्हणजेच  सर्जनशीलता त्यांच्या रक्तात आहे. कारण ते वेगाने विचार करू शकतात आणि काही सेकंदातच त्यांना वेगवेगळ्या आश्चर्यकारक कल्पना सुचतात. क्रिएटिव्हिटीच्या क्षेत्रात ते अदभुत  कामगिरी करतात जर त्यांचा भाग्यांक आणि नावाचा अंक चांगला असेल तर.

  ५ नंबर चे काही लोक अहंकारी असल्याचे दिसून येते. पण ते सहज मित्र बनवतात आणि लवकरच त्यांच्या जवळ जातात. यांचा मित्र परिवाराचा गोतावळा खूप मोठा असतो म्हणूनच यांना सार्वत्रिक मित्र म्हणतात ज्याला आपण इंग्रजीत युनिव्हर्सल फ्रेंड असेही म्हणतो. शिवाय नंबर ५ हा अंकशास्त्रात एक तटस्थ (न्यूट्रल) अंक म्हणून ओळखला जातो. तसेच ते सहजपणे त्यांची मैत्री देखील तोडू शकतात.

  मुलांक ५ वाले स्वभावाने अष्टपैलू आहेत पण दीर्घकाळ एकच गोष्ट ते करू शकत नाहीत. त्यांना बर्‍याचदा विविध प्रकारच्या गोष्टी करायच्या असतात. प्रत्येक गोष्टीत ते नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याचा प्रयत्न करतात.

  त्यांच्या  स्वभावात  एक तजेलापणा (तारुण्य) आहे आणि बहुतेक वेळा ते आपल्या जीवनात आशावादी असतात. पण काही वेळा मात्र ते निराशही होतात. खौगोलिकदृष्ट्या बुध हा सर्वात वेगवान फिरणारा ग्रह आहे आणि तो बर्‍याचदा मागे पडतो (अँटी क्लॉक चालू करण्यास सुरवात करतो). बुध ग्रहाच्या या वैशिष्ट्यामुळे५ व्या क्रमांकाच्या लोकांमध्ये काही वेळा तीव्र मनःस्थिती बदलते.

  वरील मुलभूत वैशिष्ट्ये क्रमांक ५ लोकांची  आहेत. परंतु कृपया लक्षात घ्या की ही वैशिष्ट्ये त्यांच्या नावाच्या संख्येवर किंवा भाग्यांकाच्या संख्येनुसार सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतात. आता आपण त्यांच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजूवर चर्चा करूया.

  मुलांक ५ ची सकारात्मक बाजू:

           अंक ५ लोकांच्या तीव्र बुद्धिमत्तेमुळे  हे लोक समस्येवर तोडगा काढण्यास सक्षम आहेत. ते हुशारचपळ आहेत आणि वेगाने विचार करतात. या गुणवत्तेमुळे कोणत्याही प्रकारच्या व्यवसायात जाण्यासाठी ते सर्वोत्कृष्ट लोक आहेत. जे इतरांना अशक्य वाटते ते हे लोक अगदी सहज शक्य करून दाखवतात.

           ५ व्या क्रमांकाचे लोक आनंदीउत्साहीचैतन्यशीलमजा-मस्ती करणारे आणि खेळीमेळीने वागणारे असतात. अर्थात जर ते सकारात्मक असतील तर ते परिपूर्ण मनोरंजन करणारे आहेत. काही मिनिटांतच तणावपूर्ण वातावरण खेळीमेळीचे करण्यात ते सक्षम आहेत.

           उत्कृष्ट संभाषण (संप्रेषण) कौशल्ये ही त्यांची एक शक्ती आहे. ते त्यांच्या संभाषण कौशल्यांनी लोकांना प्रभावित करण्यात  सक्षम आहेत. ते उत्कृष्ट विक्री करतात. बर्‍याचदा असे पाहण्यात आले आहे की जास्त काळ शांत राहणे त्यांना अवघड जाते.       

            मुलांक ५ च्या लोकांना वातावरणात लवचिकता निर्माण करून त्या परिस्थितीला  आपल्या अनुकूल बनवणे छान जमते. वर उल्लेख केल्याप्रमाणे बहुतांश लोक स्वतःचा व्यवसाय करतात. निर्णय घेताना ते वेगाने विचार करतात आणि जलद गतीने स्वतःचा स्वतंत्र निर्णय घेण्यात ते सक्षम आहेत. ते लवचिक आहेत. या वृत्तीमुळे ते अगदी सहज आपले मित्र बनवतात.

  मुलांक ५ ची नकारात्मक बाजू:

  क्रमांक ५ वाले जर वाईट नाव क्रमांकाशी किंवा भाग्यांकाशी निगडित असतील तर ते खूप जास्त बोलके असतात आणि त्यांच्या जास्त बडबड करण्यामुळे त्यांच्या आसपासच्या लोकांना त्रास होऊ शकतो.  तसेच ५ नंबरमध्ये अहंकार दिसतो. ते त्यांच्या मित्रांवर आणि आसपासच्या लोकांवर वर्चस्व  राखण्याचा प्रयत्न करतात,  याला जन्म दिनांक २३ वाले काही प्रमाणात अपवाद आहेत. 

  ५ क्रमांकाच्या लोकांमध्ये काही उत्कृष्ट गुण आहेत जसे की ते चपळ असतातविचार करण्यात वेगवानमजेदार वृत्ती आणि उत्कृष्ट संवाद कौशल्य करू शकतात. ह्या सर्व कौशल्याचे संयोजन त्यांच्यासाठी चमत्कार करू शकतात. परंतु या कौशल्यांचा त्यांच्याकडून चुकीच्या हेतूंसाठी देखील दुरुपयोग केला जाऊ शकतो.

           जन्म दिनांक ५१४ आणि २३ असणारे बहुतेक लोक मनाने निर्मळ असतात कारण बुध ग्रह हा पुण्य ग्रह आहेपण जर यांचा भाग्यांक आणि नाव क्रमांक यांना साजेसा नसेल तर त्याचे नकारात्मक पैलुसुद्धा लोकांना दिसतात जसे लोकांवर प्रमाणापेक्षा जास्त अधिकार गाजवण्याची वृत्ती आणि जर २३ जन्म दिनांक असलेला पुरुष असेल तर बोलण्यावरचे  नियंत्रण सुटते,  समोरच्याला वाट्टेल ते बोलणे (अपशब्द बोलणेशिवीगाळ करणे)काहींना दारूचे अथवा परस्रीसोबत वाईट संबंध ठेवण्याचे व्यसन दिसेल.

           चंद्राप्रमाणे बुध ग्रहाचा अंमल असणाऱ्या या ५ अंकाच्या लोकांचे मूड बदलत असतात.  बुध ग्रहाच्या हालचालीमुळे हे लोक १५ दिवस सकारात्मक राहतात आणि पुढील १५ दिवस त्यांना निराशावादी वाटेल. त्यांचे मन मोठ्या प्रमाणात बुध ग्रहाच्या हालचालीद्वारे नियंत्रित होते.

           ५ नंबर चे लोक कधी कधी खूप चिडचिडे असू शकतात. त्यांना गोष्टी त्यांच्या मार्गाने हव्या असतात. जेव्हा त्यांची इच्छा जवळच्या मित्रांद्वारे स्वीकारली जात नाही तेव्हा ते त्यांच्याशी कठोर बोलू लागतात. तसेच नात्यात ते त्यांच्या जोडीदारावर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि कधीकधी ते लोकांमध्येही वाईट देखावा (तमाशा) निर्माण करतात.

          पॉझिटिव्ह म्हणजेच सकारात्मक असल्यास नंबर ५ अतिशय उत्कृष्ट संख्या आहे. ५ ने शासन केलेले लोक चैतन्यशीलरंजकमनोरंजक आणि हुशार आहेत. पण प्रत्येक संख्येप्रमाणेच यातही नकारात्मक बाजू आहेत.

  मुलांक  ने घ्यायची खबरदारी आणि सुचना:

  लोकांवर स्वतःचा दबाव आणण्याचा प्रयत्न करु नका. 

  आपल्या बदलणाऱ्या मुडवर (मूड स्विंग्सवर) नियंत्रण ठेवा.

  कुठल्याही गोष्टींचा  सहज कंटाळा येऊ देऊ नका.

  मित्रांना बराच काळ टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा.

  चंद्र जसा मनाचा कारक आहे तसे बुध हा तुमच्या वाचेला प्रभुत्व देतोबळ देतो. पण त्याचा दुरुपयोग करू नका. शक्यतो आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. अपशब्द वापरणे टाळा.

   

  Previous
  Next Post »

  कृपया टिप्पणी बॉक्समध्ये कोणताही स्पॅम लिंक प्रविष्ट करू नका. ConversionConversion EmoticonEmoticon