मुलांक ४ ची महत्त्वपुर्ण माहिती | Important Details of Birth No 4:
![]() |
राहू | RAHU |
मुलांक ४ असलेल्या कोणत्याही
महिन्याच्या ४, १३, २२, ३१ जन्म तारखांमध्ये जन्म झालेल्या सर्वच व्यक्ती राहूने प्रभावित
असतात. राहूचा अंक ४ आहे. राहूला इंग्रजीत ड्रॅगन हेड असेही म्हणतात कारण अमरत्व
मिळवण्यासाठी जेव्हा स्वरभानुने कटकारस्थान करून अमृत प्राशन केले तेव्हा विष्णु
देवाने आपल्या सुदर्शन चक्राने त्याचे मुंडके त्याच्या धडापासून वेगळे केले. हे
वेगळे झालेले डोके म्हणजे राहू आणि उरलेले शरीर म्हणजे केतू. आता केतू बद्दल
म्हणजे अंक ७ विषयी आपण नंतर पाहू.
मुलांक ४ असलेल्या लोकांच्या
जीवनात इतर कोणत्याही संख्येपेक्षा जास्त चढ उतार असतात. त्यांच्या आयुष्यात अचानक
बदल घडतात जे त्यांच्या योजना खराब करतात. ही एक अपारंपारिक संख्या आहे आणि
सामान्यत: मुलांक ४ चे लोक एकसारखे दिसत नाहीत.
या लोकांचे नशिब आणि नाव जर योग्य असेल तर ते सामान्य जीवन जगू शकतात. पण तरीही वादविवाद, वादंग, तीव्र मतभेद हा त्यांच्या आयुष्याचा एक भाग आहे. तसेच आरोग्य, वित्त, नातेसंबंध, कायदेशीर किंवा मानहानी यातील जीवनाच्या एका तरी भागात त्यांना समस्या असतील. मुलांक ४ चे हे एक सामान्य वैशिष्ट्य आहे आणि ते टाळण्यास हे लोक सक्षम राहणार नाहीत.
बहुसंख्य
अंकशास्त्रज्ञांच्या मते, संख्या ४ ही एक कठीण संख्या आहे आणि
शक्यतो नाव क्रमांक (Name numerology) सुचवताना
चाल्डियन न्युमरोलॉजी (Chaldean numerology) प्रमाणे ४ अंक येणारे नाव, तसेच इंग्रजी वर्णमालेतील
४ अंक असलेले म्हणजे D, M आणि T या वर्णमालेने सुरु होणारे नाव टाळतात. याला काही अपवाद असू शकतात.
ज्योतिषशास्त्राप्रमाणे राहू हा पाप ग्रह आहे, त्याचप्रमाणे अंकशास्त्रात त्याचे
अधिपत्य ४ अंकावर आहे. आता संख्या ४ ही किती खडतर आणि किती कठीण आहे याचा अनुभव
सर्व जगाने घेतला आहेच. आताचे हे वर्ष २०२० (२+०+२+० = ४) हे राहूचे आहे आणि
राहूने ग्रासलेल्या या वर्षातल्या महाभयानक घडामोडी तुम्ही पाहिल्या आहेत.
पण येणारा प्रत्येक अनुभव
आपल्याला काहीतरी शहाणपण शिकवतो.
मुलांक ४ ची काही मुलभूत वैशिष्ट्ये पाहूया.
मुलांक
४ लोकांचा संदिग्ध स्वभाव आहे, ज्यामुळे ते इतर लोकांवर सहज विश्वास ठेवू शकत नाहीत.
पण एकदा एखाद्यावर विश्वास ठेवला तर ते आयुष्यभर त्या लोकांवर भरवसा ठेवतात. तरीही
काहींना हे लोक विक्षिप्त वाटतात कारण काही वेळा ह्यांचे वागणे विचित्र असते.
नंबर ४ चे लोक कठोर परिश्रम
करतात आणि कधीही आशा गमावत नाहीत. जरी त्यांच्या जीवनात अचानक होणाऱ्या बदलांमुळे
ते कधीकधी त्यांचे आयुष्य खराब करतात, तरीही ते लढाऊ असल्याने
त्यावर मात करण्यास सक्षम आहेत. ते कदाचित जगाला हे दाखवू शकत नाहीत की ते किती
सामर्थ्यवान आहेत परंतु सर्वात कठीण परिस्थितीत ते लढण्यास सक्षम आहेत.
मुलांक ४ असलेल्या कोणत्याही
महिन्याच्या ४, १३, २२, ३१ जन्म तारखांमध्ये जन्म झालेल्या व्यक्तींमध्ये थोडाफार फरक जाणवेल.
त्यांच्या गुणधर्मात फरक दिसेल. ह्या व्यक्तींच्या गुणांमधील तीव्रता कमी-अधिक
प्रमाणात वेगळी असते. कारण जन्म दिनांक ४, १३, २२, ३१ चा मुलांक जरी ४ असला तरी यातला १३, २२ आणि ३१ ह्या दोन अंकी संख्येचे एक अंकी संख्येत विभाजन झाले आहे.
थोडक्यात १३ जन्म तारीख
असलेल्या व्यक्तीमध्ये १ (सुर्य) आणि ३ (गुरु) ग्रहाचे थोडेफार गुणधर्म
दिसतील. अगदी तसेच ३१ जन्म तारीख असलेल्या व्यक्तीमध्ये ३ (गुरु) आणि १ (सुर्य) ग्रहाचे थोडेफार गुणधर्म दिसतील. परंतु २२ जन्म
तारीख असलेल्या व्यक्तीमध्ये पाहिले तर दोन्ही ग्रह चंद्राचे म्हणजे २ (चंद्र) आणि
२ (चंद्र) आहे. त्यामुळे २२
जन्म दिनांक वाले इतर ४, १३, आणि ३१ जन्म
दिनांक असणाऱ्या लोकांपेक्षा वेगळे जाणवतील.
जन्म दिनांक ४, १३, २२ आणि ३१ असणारे बहुतेक लोक तुम्हाला अनाकलनीय वाटतील, त्यांच्याभोवती एक गूढ वलय निर्माण झालेले दिसेल. कारण यातले काही जण
परस्त्रीकडे आकर्षित होणारे किंवा परस्त्रीसोबत प्रेमसंबंध ठेवणारे, कमी-अधिक प्रमाणात दारूचे व्यसन असणारे दिसतील. बहुतांश नंबर ४ चे
लोक आपल्या जोडीदारावर कधीही समाधानी नसतात. ज्यामुळे त्यांचे
लग्नाबाहेरचे संबंध असतात.
पण हे लोक आधुनिक
तंत्रज्ञानात अद्ययावत असणारे म्हणजेज अपडेटेड राहणारे दिसतील. अर्थात
४, १३, २२, आणि ३१ जन्म दिनांकामध्ये नाव क्रमांक (name numerology) आणि त्यांचा भाग्यांक सुद्धा पाहतात. म्हणूनच ४, १३, २२, ३१ जन्म
दिनांक असणाऱ्या व्यक्तीच्या गुणांमधील तीव्रता कमी अधिक प्रमाणात वेगळी असते.
मुलांक ४ लोकांना जीवनात
पुढे जाण्यासाठी इतर क्रमांकापेक्षा जास्त संघर्ष करावा लागतो. जरी त्यांना जीवनात
गोष्टी सहज मिळाल्या तरी त्या त्यांच्याबरोबर फार काळ टिकत नाहीत. यश टिकवण्यासाठी
आणि साध्य करण्यासाठी त्यांना कठोर परिश्रम करावे लागतील. खूप संघर्ष करून
यश मिळाले किंवा चांगले काम केले तरी त्यांचे कौतुक केले जात नाही किंवा त्याची
पोचपावती त्यांना मिळत नाही. काहींना कायदेशीर कार्यवाहीला सामोरे जावे लागते.
संख्या ४ च्या लोकांचे गुप्त
शत्रू देखील असतात कारण जेव्हा लोकांकडून त्यांना मदत मिळवण्याची वेळ येते तेव्हा
त्याबाबतीत ते दुर्दैवी ठरतात. ते एखाद्यास आपला मित्र समजतील परंतु
नंतर कदाचित त्यांची निराशा होईल.
मुलांक ४ च्या व्यक्तींची स्मरणशक्ती खूपच मजबूत असते. ते इतरांसारख्या गोष्टी विसरत नाहीत. जे काही ते ऐकतात ते त्यांच्या स्मृतीत छापले जातात. ती माहिती त्यांच्या मेंदूत संचयित होते आणि ती त्यांना झटपट आठवते. परिणामी, या गुणामुळे अंक ४ चे व्यक्ती त्यांच्या मित्र मंडळींमध्ये प्रसिद्ध होतात.
जर एखादया व्यक्तीला काही
माहिती हवी असेल तर बहुतांश वेळेला मुलांक ४ च्या व्यक्तींची
मदतीसाठी आठवण येते किंवा त्यांच्याकडे मदतीसाठी निर्देशित केले जाते. कारण हे लोक
कोणत्याही वेळी कोणालाही मदत करण्यास तयार असतात.
क्रमांक ४ लोकांकडे
कोणत्याही कार्याकडे बघण्याचा दृष्टीकोन अपारंपरिक असतो. जर ते मनोरंजन क्षेत्रात
किंवा मिडिया मध्ये गेले तर त्यांच्या कार्यात एक वेगळेपण दिसते ज्याला इंग्रजीत
आऊट ऑफ द बॉक्स म्हणतात.
परंतु कृपया लक्षात घ्या की
ही मुलभूत वैशिष्ट्ये संख्या ४ लोकांची त्यांच्या नावाच्या संख्येवर किंवा
भाग्यांक संख्येनुसार सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतात. आता त्यांच्या
सकारात्मक आणि नकारात्मक बाजू पाहूया.
मुलांक ४ ची सकारात्मक बाजू:
वर उल्लेख केल्याप्रमाणे
मुलांक ४ चे लोक सहज इतर लोकांवर विश्वास ठेवत नाहीत. परंतु एकदा का त्यांनी हा
विश्वास निर्माण केला की ते खूप विश्वासार्ह मित्र असतात आणि जेव्हा त्यांना गरज
असते तेव्हा नेहमीच ते त्यांच्या मित्रांच्या शेजारी उभे असतात.
२२ तारखेला जन्मलेल्या
लोकांव्यतिरिक्त जन्म दिनांक ४, १३ आणि ३१ च्या लोकांकडे उत्कृष्ट
संप्रेषण (संभाषण) कौशल्य आहे. त्यांच्याकडे बोलण्याची कधीही न संपणारी ऊर्जा असते
आणि ते लोकांसमोर बोलू शकतात आणि त्यांना प्रेरणा देखील देतात.
आपण आपले एखादे कार्य किंवा
आपला एखादा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी एखाद्याच्या शोधात असाल तर ते काम
मुलांक ४ ला द्या, ते त्या कामाला समर्पित करून चोख
पूर्ण करतील. तुम्ही असे ही पाहिले असेल कि ५०-५५ वर्षे वयोगटातील लोकांमध्येही
बर्यापैकी उर्जा असते आणि उशीरापर्यंत कार्य करण्यास ते सक्षम असतात.
मुलांक ४ चे लोक त्यांच्या
आयुष्यात बर्याच गोष्टी शिकत असतात कारण त्यांना त्यांच्या आयुष्यात बऱ्याच कठिण
आणि खडतर प्रवासातून जावे लागते. त्यामुळेच ते संयमी बनतात, त्यांची
धैर्य पातळी खूप छान असते. एकंदरीत यांचे मनोधैर्य आणि संयम बळकट असतो.
मुलांक ४ च्या लोकांकडे
प्रत्येक समस्येचा व्यावहारिक दृष्टीकोन असतो आणि ते खूप उदार असतात. आपणास
त्यांच्याकडून खूप सकारात्मक उर्जा मिळणार नाही परंतु जर आपण दीर्घकालीन मैत्री
शोधत असाल तर ते आपल्यासाठी परिपूर्ण मित्र होऊ शकतात.
मुलांक ४ ची नकारात्मक बाजू:
मुलांक ४ लोकांचा स्वभाव
कधीकधी खरोखरच वाईट असू शकतो.ते सहज आपल्या रागावर ताबा गमावतात. लोक
त्यांच्यापासून दूर जाण्याचे हे एक कारण आहे. बऱ्याचदा ते लोकांशी खूप
वाईट वागतात खासकरून जर ते एखाद्या कंपनीचे मालक अथवा बॉस असतील तर; या कारणामुळे मुलांक ४ हे बॉस म्हणून खरोखरच
खराब वाटतात.
मुलांक ४ चे लोक आयुष्यात
बर्याच वेळा फसवतात, ज्यामुळे त्यांना शंकास्पद आणि गंभीर
स्वभाव प्राप्त होतो. परंतु या वैशिष्ट्यामुळे आजूबाजूच्या इतरांनासुद्धा काही
वेळा त्रास सहन करावा लागतो. त्याच्या सोबत असणाऱ्या बऱ्याच जणांना त्यांच्याबद्दल
मनात शंका येत राहते.
बहुतेक प्रकरणांमध्ये मुलांक ४ हे कधीही त्यांच्या जोडीदाराबरोबर समाधानी नसतो आणि त्यांचे
विवाहाबाहेरचे संबंध असतात. त्यांना क्रमांक १ किंवा २ क्रमांकाशी विवाह करावा अशी
जोरदार सूचना आहे.
मुलांक ४ ला सशक्त नाव
क्रमांक वापरण्याचे सुचविले आहे. त्यांनी आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात
अंकशास्त्रज्ञांचा सल्ला घ्यावा आणि आवश्यक असल्यास त्यांचा नाव क्रमांक बदलला
पाहिजे. साधारणपणे पाहिलेले आहे की ते वयाच्या ३० व्या वर्षा नंतरच साजेसे जीवन
जगू शकतात. तोपर्यंत ते अस्थिरच असतात.
मुलांक ४ ने घ्यायची खबरदारी आणि सुचना:
आपला स्वभाव नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा.
रागावर ताबा ठेवा.
लग्नाआधी दोनदा विचार करा, जोडीदार
आपल्यासाठी योग्य आहे का याची खात्री पटल्यावरच लग्न करा.
कधीही कोणत्याही प्रकारच्या काळाबाजार, सट्टेबाजीच्या
कार्यात जाऊ नका आणि शेअर बाजार पूर्णपणे टाळा.
जवळजवळ प्रत्येक गोष्टीत पत्ता, घर
किंवा फ्लॅट नंबर, कार नंबर इ. मध्ये क्रमांक ४ आणि ८
टाळा.
आयुष्याच्या सुरुवातीला अंकशास्त्रज्ञांना भेटा
आणि नाव मिळवा.
कृपया टिप्पणी बॉक्समध्ये कोणताही स्पॅम लिंक प्रविष्ट करू नका. ConversionConversion EmoticonEmoticon