जन्मदिनांक ३, १२, २१, ३० असणाऱ्या मुलांक ३ चे अंकशास्त्र | Numerology of Birth Number 3,12,21,30

मुलांक ची महत्त्वपुर्ण माहिती | Important Details of Birth No 3:

गुरु । JUPITER

गुरु ग्रह | JUPITER PLANET  मुलांक असलेल्या कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१, ३० जन्म तारखांमध्ये जन्म झालेल्या सर्वच व्यक्ती गुरु ग्रहाने प्रभावित असतात. चाल्डीयन अंकशास्त्रात संख्या ३ गुरू (बृहस्पति) ग्रहासाठी आहे. बृहस्पति हा सर्व ग्रहांमध्ये सर्वात मोठा ग्रह आहे आणि त्याला ज्ञानी ग्रह म्हणून ओळखले जाते.

  तसेच ज्योतिषातही, बृहस्पति हा एक अतिशय महत्वाचा ग्रह आहे आणि तो लोकांना त्यांच्या आयुष्यात मोठ्या उंचीवर नेऊ शकतो. यशस्वी कारकीर्द होण्यासाठी, कुंडलीत एक मजबूत बृहस्पति ग्रह असणे खूप महत्वाचे आहे. गुरू म्हणजे अंधार दूर करणे. गुरू ग्रह कठोर परिश्रम, ज्ञान, धैर्य, न्याय आणि स्वत: ची शिस्त यांचा ग्रह आहे.

  शिक्षण, विवाह आणि संतती यावर बृहस्पतिचा अंमल असतो. तसेच संख्या ३ ही संख्याशास्त्रातील सर्वोत्कृष्ट क्रमांकांपैकी एक आहे. परंतु कृपया लक्षात घ्या की केवळ मुलांक ३ च्या बाबतीतच हे लागू आहे. मुलांक ३ क्रमांक म्हणून उत्कृष्ट आहे, परंतु मुलांक ३ च्या भाग्यांक आणि नाव क्रमांकासाठी तेच सांगू शकत नाही.

  मुलांक ३ असलेल्या कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१, ३० जन्म तारखांमध्ये जन्म झालेल्या सर्वच व्यक्तींमध्ये थोडाफार फरक जाणवेल. त्यांच्या गुणधर्मात फरक दिसेल.

  मुलांक ३ असलेल्या व्यक्तींच्या गुणांमधील तीव्रता कमी-अधिक प्रमाणात दिसेल. कारण जन्म दिनांक ३, १२, २१, ३० चा मुलांक जरी ३ असला तरी यातला १२, २१ आणि ३० ह्या दोन अंकी संख्येचे एक अंकी संख्येत विभाजन झाले आहे.

  थोडक्यात १२ जन्म दिनांक असलेल्या व्यक्तीमध्ये १ (सुर्य) आणि २ (चंद्र) ग्रहाचे थोडेफार गुणधर्म दिसतील. अगदी तसेच २१ जन्म दिनांक असलेल्या व्यक्तीमध्ये २ (चंद्र) आणि १ (सुर्य) ग्रहाचे थोडेफार गुणधर्म दिसतील. परंतु १२ आणि २१ मध्ये तुलना केली तर नंबर १२ मध्ये १ (सुर्य) ग्रह हा २ (चंद्र) च्या आधी येतो, म्हणजेच चंद्राच्या आधी सुर्य आघाडी घेतो आणि सुर्य हा चंद्रापेक्षा बळकट ग्रह आहे म्हणून १२ हा अंक २१ च्या तुलनेत जास्त मजबूत अंक ठरतो. तुम्ही जर निरीक्षण केले तर २१ अंक हा १२ च्या तुलनेत थोडा हळवा वाटेल.

  ३ आणि ३० जन्म दिनांक असलेल्या व्यक्तीमध्ये ३० या अंकाला ० (शून्य) असल्याने ३ अंकाच्या तुलनेत ३० मध्ये असणारी शक्ती कमी करते, त्यामुळे ३ अंक ३० पेक्षा जास्त मजबूत ठरतो. अर्थात ३, १२, २१, ३०  जन्म दिनांकामध्ये नाव क्रमांक (name numerology)  आणि त्यांचा भाग्यांक सुद्धा पाहतात. 

  म्हणूनच  १२२१३०  जन्म दिनांक असणाऱ्या व्यक्तीच्या गुणांमधील तीव्रता कमी अधिक प्रमाणात वेगळी असते. ३० जन्म दिनांक असणारा समोरच्या व्यक्तीला ३ जन्म दिनांकपेक्षा जास्त कठोरपणे टिका करताना दिसतील अगदी याच्या उलट काही गुणधर्मांमध्ये तुम्हाला वेगळे चित्र पाहायला मिळेलजसे ३० जन्म दिनांक असणारा इतर जन्म दिनांक असणाऱ्या १२२१ च्या तुलनेत जास्त अस्वस्थ दिसेल.  

  आता आपण मुलांक ३ ची आणखी काही वैशिष्ट्ये पाहूया.

  मुलांक ३ च्या लोकांना त्यांच्या क्षमतांबद्दल आत्मविश्वास असतो. बहुतेक वेळा, त्यांच्यात सातत्य दिसते आणि  ते सुसंगत आहेत,  मुलांक २ लोकांसारखे मुड स्विंग त्यांच्यात दिसत नाहीत. परंतु काहीवेळा हा आत्मविश्वास जास्त प्रमाणात वाढतो आणि ह्या अतिआत्मविश्वासाची  नंबर ३ लोकांना जाणीव होत नाही. त्यांना असे वाटते की ते उत्कृष्ट आहेत आणि यामुळेच त्यांची प्रतिष्ठा खराब होते.

  मुलांक ३ प्रामाणिक असतो, बहुतेक वेळा असे पाहण्यात आले आहे. कारण बृहस्पति हा न्याय आणि शिस्तीचा ग्रह आहे. तर ज्युपिटरद्वारे (गुरु ग्रहाने) शासित लोक त्यांच्या क्षमतेमुळे आयुष्यात प्रगती करतात आणि त्यांची वाढ होते. ते चतुरपणे त्यांचा मार्ग शोधण्यात सक्षम आहेत, परंतु या प्रक्रियेत ते प्रामाणिक राहतात.

  बौद्धिक हुशारीने ते त्यांचा मार्ग शोधतात. क्रमांक ३ मधील बहुतेक लोक बुद्धीमान आहेत आणि त्यांच्या चांगल्या बुद्धीने आयुष्यात ते उच्च पातळीवर पोचू शकतात.

  मुलांक ३ चे लोक मुत्सद्दी आहेत ज्याला आपण इंग्रजीत डिप्लोमॅट म्हणतो.  ३ नंबरचे लोक सर्व गोष्टींना आणि प्रत्येकाला होय म्हणण्यात पटाईत आहेत. पण शेवटी ते तेच करतात जे त्यांना आनंद देते. तसेच, लवाद म्हणून काम करण्यासाठी ते सर्वोत्कृष्ट आहेत. ते त्यांचा स्वभाव नियंत्रित करण्यात सक्षम आहेत आणि अनावश्यकपणे तीव्र वाद घालत बसत नाहीत त्याऐवजी ते असे वाद टाळतात.

  , १२, २१ आणि ३० तारखेला जन्मलेले लोक जरी अगदी गरीब परिस्थितीत जन्मले असले तरीही, मुलांक ३ चे  लोक जीवनात खूप प्रगती करून उच्च पदावर पोचू  शकतात. जर त्यांचे भाग्यांक आणि नाव क्रमांक सुसंगत असतील तर ते त्यांच्या बुद्धिमत्तेचा उपयोग सकारात्मक कार्यासाठी करतात आणि चांगले नाव आणि किर्ती कमावू शकतात, चांगले नावलौकीक मिळवून प्रसिद्ध होऊ शकतात. थोडक्यात सांगायचे तर हे लोक शून्यातून आपले विश्व निर्माण करून झिरो ते हिरो असा प्रवास करू शकतात. 

  जरी वरील मूलभूत वैशिष्ट्ये मुलांक ३ लोकांची असली तरी कृपया हे लक्षात घ्या की ही वैशिष्ट्ये त्यांच्या नावाच्या संख्येवर किंवा भाग्यांक संख्येनुसार सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतात. आता ३ नंबरच्या सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींवर चर्चा करूया.

  मुलांक ३ ची सकारात्मक बाजू:

  बृहस्पति हा न्याय आणि शिस्तीचा ग्रह आहे म्हणून मुलांक ३ चे लोक नियम मोडताना दिसत नाहीत, ते शिस्तबद्ध आहेत. समस्या सोडवण्यासाठी ते त्यांची तल्लख बुद्धिमत्ता वापरून हुशारीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. शक्यतो सामान्यत: ते कायदे मोडत नाहीत.

  मुलांक ३ कडे आत्मविश्वासाची पातळी चांगली आहे.  हे लोक त्यांच्या क्षमतेबद्दल आत्मविश्वास ठेवतात आणि नेहमीच पुढाकार घेतात. ते नेते म्हणून उत्कृष्ट कार्य करतात आणि व्यवस्थापित (व्यवस्थापण) करण्याचे उत्कृष्ट गुण त्यांच्याकडे आहेत. ते विभाग आणि कंपन्यांचे विभागप्रमुख म्हणून अपवादात्मक आहेत.  

  मुलांक ३ मध्ये बरीच सकारात्मक उर्जा असते.  फार कमी प्रमाणात मी क्रमांक ३ लोकांना  त्यांच्याबद्दल नकारात्मक विचार करताना पाहिले आहे. मुलांक २, , , , ८ आयुष्यातल्या अनेक संकटांतून जात असल्यास स्वतःबद्दल नकारात्मक असल्याचे दिसून येते (मुलांक १ सहसा जाणवू देत नाही, मुलांक ९ माझ्या निरीक्षणात आलेले नाही, आणि मुलांक ४ हा अंक राहूचा आहे, त्याबद्दल पुढे बोलूच) पण मुलांक ३ चे लोक नेहमीच स्वतःबद्दल  आणि त्यांच्या  कर्तृत्वाबद्दल सकारात्मक असतात.

  बरेच लोक असे आहेत की जे काम सुरू करतात परंतु ते पूर्ण करण्यास सक्षम नाहीत. परंतु सामान्यत: क्रमांक ३ चे लोक नियोजित मार्गाने कार्य करतात. एकदा त्यांनी एखादे काम सुरू केले की ते पूर्ण करतात. आपल्या योजना अंमलात आणून त्याची यशस्वी अंमलबजावणी करतात.

  मुलांक ३ चे लोक कधीच कोणालाही नाही बोलू शकत नाहीत म्हणजे मला जमणार नाही किंवा मी करू शकत नाही, असे सहसा ते समोरच्या व्यक्तीला बोलणार नाही. त्यांच्या संपर्कात येणार्‍या प्रत्येकाला ते मदत करतात. ते सार्वत्रिक मदतनीस म्हणजेज युनिव्हर्सल हेल्पर्स आहेत.  जर सकारात्मक असेल तर ते सार्वत्रिक सहाय्य करतात.

  मुलांक ३ ची नकारात्मक बाजू:

  , १२, २१ आणि ३० तारखेला जन्मलेले लोक स्वत:वर आत्मविश्वास ठेवतात आणि स्वत: बद्दल खूप उच्च विचार करतात. बरेचसे नंबर ३ चे लोक गर्विष्ठ आहेत जे त्यांच्या सभोवतालच्या लोकांना त्रास देतात, त्यातले काही बढाईखोर आहेत. 

  ते अत्यधिक आशावादी असतात. जेव्हा त्यांच्या स्वतःच्या क्षमतेचा विचार केला जातो तेव्हा मुलांक ३ चे लोक कधीकधी जास्त आशावादी होतात. जरी त्यांच्यात पुष्कळ गुण नसले तरी त्यांना असे वाटते की ते उत्कृष्ट आहेत, ते उत्तम आहेत. या गुणवत्तेमुळेच त्यांना जीवनातल्या अपयशाला सामोरे जावं लागतं. कोणीही त्यांचा हा दृष्टिकोन आणि ही वृत्ती बदलू शकत नाही.

  मुलांक ३ चे लोक स्वत: बद्दल खूप जास्तच विचार करतात कारण ते इतरांचा अंदाज लावण्यास सुरुवात करतात, थोडक्यात ते दुसर्यांना जज (judge) करतात. ते इतर लोकांच्या कल्पनेवर टिका करतात आणि त्यामधील दोष, त्रुटी आणि पळवाट शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांना नेहमी असे वाटते कि ते जे विचार करतात ते योग्यच आहेत आणि त्यांच्या सभोवतालचे लोक मूर्ख आहेत. इतरांबद्दल ते नकारात्मक दृष्टीकोन ठेवतात. स्वतः सकारात्मक राहतील मात्र दुसर्यांना नकारात्मक ठरवतात.

  नंबर ३ लोकांना जीवनात बरेच काही साध्य करायचे आहे आणि ते अति महत्वाकांक्षी आहेत. यामुळे त्यांना अल्पावधीत बरेच काही साध्य करायचे असते. त्यांची ही वृत्तीच त्यांना अस्वस्थ करते.

  क्रमांक ३ ही एक भाग्यवान संख्या आहे आणि गुरू हा विश्वातील सर्वोत्तम ग्रह आहे. जर क्रमांक ३ मधील लोकांची परिपक्वता पातळी चांगली असेल तर ते आयुष्यात खूप उच्च स्थान प्राप्त करण्यास सक्षम आहेत.

  मुलांक ३ ने घ्यायची खबरदारी आणि सुचना:

  यश हे एका रात्रीत मिळत नाही म्हणून थोडे धीर धरा.

  हाताची पाचही बोटे एकसारखी नसतात, तसेच प्रत्येकात काहीतरी उणीव असतेच. तुम्ही चांगले असाल पण सर्वोत्तम नाही, त्यामुळे इतरांना कमी लेखू नका.

  लोकांवर आणि त्यांच्या कल्पनांवर टीका करू नका.

  स्वतःबद्दल जास्त विचार करू करा.

  आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवा.

  मुलांक ३ चे लोक आपल्या प्रगतीत उच्च वाढ करतात.  परंतु बरेच लोक उच्च स्तरावर पोहोचू शकत नाहीत, कारण ते स्वत:ला खूपच उच्च आणि सर्वोत्कृष्ट समजू लागतात आणि त्यांच्या मार्गात  येणार्‍या जवळजवळ प्रत्येक जणांवर ते टिका करण्यास सुरवात करतात. जर ते जीवनात थोड विनम्र राहण्यास आणि त्यांच्या अहंकारावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असतील तर ते खूप यशस्वी होतील.

   

   

   


  Previous
  Next Post »

  कृपया टिप्पणी बॉक्समध्ये कोणताही स्पॅम लिंक प्रविष्ट करू नका. ConversionConversion EmoticonEmoticon