मुलांक १ ची महत्त्वपुर्ण माहिती | Important Details of Birth No 1:
![]() |
सुर्य ग्रह | SUN |
मुलांक १ असलेल्या
कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९, आणि २८ जन्म
तारखांमध्ये जन्म झालेल्या सर्वच व्यक्ती सुर्य ग्रहाने प्रभावित असतात. चाल्डीयन अंकशास्त्राप्रमाणे
१ ही संख्या सुर्याची आहे. मुलांक
१ असलेल्या कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९, २८ जन्म तारखांमध्ये जन्म झालेल्या सर्वच
व्यक्ती सारख्याच असतात का? किंवा त्यांच्या गुणधर्मात एकसारखीच समानता
असते का?
त्यांच्यात थोडाफार फरक आहे.
त्यांच्यात असलेल्या गुणांमधील तीव्रता कमी-अधिक प्रमाणात दिसेल. कारण जन्म दिनांक
१, १०, १९, २८ चा मुलांक जरी १ असला तरी
यातला १०, १९ आणि २८ ह्या दोन अंकी संख्येचे एक अंकी
संख्येत विभाजन झाले आहे.
थोडक्यात १९ जन्म दिनांक
असलेल्या व्यक्तीमध्ये १ (सुर्य) आणि ९ (मंगळ) ग्रहाचे थोडेफार गुणधर्म दिसतील. २८ जन्म
दिनांक असलेल्या व्यक्तीमध्ये २ (चंद्र) आणि ८ (शनि) ग्रहाचे थोडेफार गुणधर्म
दिसतील. आणि म्हणूनच
त्यांच्या गुणांमधील तीव्रता वेगळी असते. अशाच रितीने त्याच्या नावाचा
परिणामसुद्धा त्यांच्या वागण्या-बोलण्यात आणि आयुष्यात दिसून येतो. कारण काही
जणांचा नावाचा अंक १ असेल, काहींचा २, काहींचा ३..... त्याच रितीने ४ ते ९ पर्यंत असू
शकतो.
याचमुळे प्रत्येकाच्या
जीवनात वेगवेगळे परिणाम दिसतात. कोणी जास्त यशस्वी तर कोणी कमी यशस्वी दिसतो. आणि
म्हणूनच यांच्या आयुष्यात जास्त चांगले परिणाम दिसावेत यासाठी चाल्डीयन किंवा
पायथागोरियन न्युमरॉलॉजीप्रमाणे अंकशास्त्रज्ञाच्या (Numerolgist) च्या मदतीने त्यांच्या नावात बदल केले जातात.
मुलांक १ ची काही मुलभूत वैशिष्ट्ये पाहूया.
मुलांक १ चे लोक सुर्याच्या अंमलाखाली असल्याने सुर्याप्रमाणेच या लोकांचे चरित्र खूप मजबूत असते एका अर्थी
यांचे चारित्र्य खंबीर आणि सामर्थ्यवान असते. बर्याचदा इतर लोकांना त्यांचे विचार
बदलणे कठीण जाते. हे लोक ठाम विचाराचे आहेत. हे आपले विचार आणि निर्णय सहसा बदलत
नाहीत.
१, १०, १९, २८ जन्म दिनांक असलेल्या
व्यक्तींना नेहमी जिंकायला आवडते, त्यांना हरणे आवडत नाही मग ते खेळ असो, युद्ध असो किंवा व्यवसाय.
त्यांना नेहमी आपल्या कामात अग्रेसर रहायला आवडते. जर ते हरले किंवा एखादया कामात
अयशस्वी झाले तर ती गोष्ट त्यांच्या मनाला लागते. खासकरून जन्म दिनांक २८ असणारे
जास्त नाराज होतात. कारण २ (चंद्र) आणि ८ (शनि) या दोन्ही ग्रहाचे गुणधर्म २८ जन्म
तारखेत असल्याने चंद्राची चंचलता, हळवेपणा आणि शनिची कार्यक्षमता, न्यायप्रियता दिसते.
त्याचप्रमाणे जन्म दिनांक १९ मध्ये सुर्याचे तेज, नियमांचे काटेकोर पालन आणि मंगळ ग्रहाची गती, कार्यतत्परता दिसते.
१, १०, १९, २८ जन्म दिनांक असलेल्या
व्यक्तींना सहसा माघार घ्यायला आवडत नाही. त्यात त्यांचा अहंकार दुखावतो. खासकरून
आपल्या जोडीदारासोबत झालेल्या मतभेदात, भांडणात यांना नमतेपणा घ्यायला आवडत नाही. यात
१ आणि १० जन्म दिनांक असणारे पुढे असतात. त्यामानाने १९ आणि २८ थोडे लवकर नमते
घेतील.
तसेच १, १०, १९, २८ जन्म दिनांक असलेल्या
व्यक्तींना आपल्या जवळच्या व्यक्तीचे खासकरून जोडीदाराचे, आईचे लक्ष वेधुन घेणे आवडते, त्यांच्याकडे दुर्लक्ष
केलेले त्यांना आवडत नाही. अशा बाबतीत २८ आणि १९ जास्त पुढे असतात.
त्यांच्यापेक्षा दुसऱ्या व्यक्तींकडे लक्ष दिलेले यांना आवडत नाही. त्यामुळे अशा
व्यक्तींना त्या व्यक्तीचा मत्सर, हेवा वाटतो.
मुलांक १ च्या लोकांकडे
नेतृत्व व व्यवस्थापन कौशल्ये खूप चांगली आहेत. त्यांच्यात एक सशक्त आणि खंबीर
व्यक्तिमत्व असल्यामुळे ते आयुष्यभर नेतृत्व करतात. ते सहज आशा गमावत नाहीत आणि
उत्कृष्ट प्रेरणा कौशल्य देखील ठेवतात. जेव्हा त्यांना जबाबदाऱ्या आणि नेतृत्वाची पदे दिली जातात तेव्हा ते उत्कृष्ट कामगिरी
करतात.
मुलांक १ च्या लोकांना
थाटामाटात जगायला आवडते आणि शोबाजी, देखावा करायला आवडते. त्यांना स्वतःबद्दल बोलणे आवडते आणि
नेहमी आकर्षणाचे केंद्र बनायचे असते.
यामुळे ते तसेच कपडे परिधान करतात
जेणेकरुन लोक त्यांना लक्षात ठेवतील अथवा लोक त्यांचे निरीक्षण करतील. तसेच, त्यांना भव्यपणे पैसे खर्च
करण्यास आवडते.
मुलांक १ असलेल्या
व्यक्तींमध्ये भरपूर उर्जा आहे आणि सहसा ते आशा गमावत नाही. परंतु त्यांच्यात बर्यापैकी
अहंकार असतो जो त्यांच्यासाठी अडथळा ठरतो. ते आपल्या कामाला जास्त महत्त्व देतात.
हे लोक महत्वाकांक्षी असतात आणि त्यांच्या करियरला नेहमीच प्रथम प्राधान्य देतात.
मुलांक १ च्या लोकांना खूप
भाग्यवान मानले जाते. त्यांना सरकार आणि लोकांकडून अनुकूलता प्राप्त होते. जर त्यांनी
आपला अहंकार सोडला आणि आवश्यकतेनुसार इतरांकडे मदत मागितली, तर हे लोक त्यांच्या आयुष्यात कोणत्याही उंचीवर पोहोचू शकतात.
गरज भासल्यास त्यांनी मदत
मागितली पाहिजे. ते इतरांकडून मदत घेण्यात भाग्यवान आहेत आणि सामान्यत: इतर लोक
त्यांना मदत करण्यास नकार देत नाहीत. हे लोक नियमांचे काटेकोर पालन करतात. सहसा हे
नियमांचे उल्लंघन करत नाहीत, त्यांना ते आवडतही नाही.
मुलांक
१ चे लोक खूप सर्जनशील आहेत. ते कला आणि क्रिएटिव्हिटी संबंधित क्षेत्रात
उत्कृष्ट काम करतात. जगातील बर्याच यशस्वी सेलिब्रिटींवर सुर्याचा प्रभाव दिसतो.
मुलांक
१ च्या लोकांचे उत्कृष्ट वैशिष्ट्य म्हणजे ते जीवनात व्यावहारिक असतात. अनेकदा हे
लोक खरे प्रेमी देखील असतात. त्यांच्याकडे जवळजवळ प्रत्येक गोष्टीचे सर्वात जास्त
व्यावहारिक निराकरण आहे.
मुलांक
१ च्या लोकांची दिवसाची सुरुवात अथवा कामाची सुरुवात फार लवकर सहसा पहाटेच होते.
कारण हे भल्या पहाटे उठतात. रात्री उशिरा झोपण्यापेक्षा सकाळी लवकर उठून काम
करण्याला ते प्राधान्य देतात.
मुलांक
१ च्या लोकांना परावलंबी राहण्यापेक्षा स्वावलंबी
जीवन जगायला आवडते. ते इतके स्वतंत्र आहेत की ते इतरांच्या भावनांकडे दुर्लक्ष
करतात. मदतीसाठी इतरांकडे वळण्याऐवजी किंवा त्यांची मदत घेण्याऐवजी ते सर्व काही
स्वतः हाताळण्याचे प्रयत्न करतात. तसेच स्वकर्तृत्वावर काम मिळवण्याची धडपड, चिकाटीने
ते पूर्ण करण्याची जिद्द त्यांच्यात दिसून
येते.
यातले
बरेचसे नामांकित लोक कठीण प्रसंगी आपल्या अधिनिष्ठांची पुरेपूर काळजी घेतात.
त्यांना काय हवे काय नको ते पाहतात. तसेच ते आपली सामाजिक बांधिलकीसुद्धा जपतात.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कितीही कठीण प्रसंग आले तरी ते लगेच कोलमडून जात नाहीत, त्यावेळी
अशा प्रसंगांना ते धिराने तोंड देतात आणि
पुन्हा नव्या दमाने कामाची सुरुवात करतात. याचे उत्तम उदाहरण रतन टाटा
(जन्म- २८ डिसेंबर १९३७)
वर
उल्लेख केलेली ही मुलांक १ च्या लोकांची मूलभूत वैशिष्ट्ये आहेत. परंतु कृपया
लक्षात घ्या की ही वैशिष्ट्ये त्यांच्या नावाच्या अंकावर किंवा भाग्यांकानुसार
सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतात. काही लोकांमध्ये अधिक सकारात्मक असतात; दुसरीकडे
काहींमध्ये नकारात्मक गुण अधिक असू शकतात.
मुलांक १ च्या सकारात्मक बाजू:
मुलांक १ चे लोक नेहमी
नव-नवीन कल्पना घेऊन येतात. त्यांच्यात नवनिर्मितिक्षमता आहे. ते जेव्हा विचार करतात किंवा कुठल्याही
गोष्टीचे निराकरण करतात तेव्हा त्याचे
समाधान जगावेगळे असते म्हणजेज ज्याला आपण आऊट ऑफ द बॉक्स म्हणतो. तसेच त्यांच्यात
मौलिकता आणि त्यांच्या कल्पकतेमध्ये अस्सलपणा आहे. ते इतरांची नक्कल करत नाही
मात्र कधी कधी इतरांशी तुलना जरूर करतात, स्पर्धासुद्धा करतात.
वर नमूद केल्याप्रमाणे मुलांक १ च्या लोकांकडे उत्कृष्ट
नेतृत्व कौशल्य आहे. मुळातच त्यांना कोणाचे ही आदेश पाळायला आवडत नाही कारण
कोणाच्याही अधीनस्थ राहून काम करणे त्यांना कठीण जाते. जेव्हा त्यांना एखादी
जबाबदारी दिली जाते तेव्हा त्यांच्या निर्णयात कोणीही हस्तक्षेप केलेला त्यांना आवडत नाही. त्यांना
गोष्टी त्यांच्या मार्गाने करण्यास आवडतात आणि सामान्यत: ते त्यांचे कार्य
परिपूर्णतेने पूर्ण करतात.
मुलांक १ चे लोक त्यांच्या उद्दीष्टांचा निर्णय घेतात, तेव्हा ते
पूर्ण करतात. त्यांच्या मनामध्ये जास्त चढ-उतार होत नाहीत आणि त्यांचे मत बदलणे
खूप कठीण आहे, ते आपल्या मतावर ठाम राहतात. स्वतःच्या
कल्पनांवर त्यांना ठाम विश्वास आहे.
मुलांक १ चे लोक उत्साही आहेत आणि कोणतेही काम ते अर्धवट
सोडत नाहीत. तसेच, बहुतेक सर्व कामे ते स्वत: करण्याचा
प्रयत्न करतात आणि त्यांच्या अधीनस्थांना शक्य तितके कमीतकमी अधिकार सुपूर्द करतात
आणि कामे देतात कारण ते स्वतःवर जास्त
विश्वास ठेवतात. आशावादी असणे हा मुलांक १ मधील एक सकारात्मक गुण आहे जो
त्यांच्या आजूबाजूच्या इतर लोकांना देखील प्रवृत्त करतो. खूप कठीण काळातही ते सहज
हार मानत नाहीत.
मुलांक १ च्या नकारात्मक बाजू:
मुलांक १ चे लोक खूप अधिक विश्वासार्ह आहेत पण ते इतरांवर
अधिकार गाजवतात जे बहुधा त्यांच्या आसपासच्या लोकांना आवडत नाही.
मुलांक १ चे लोक खूप हट्टी, दुराग्रही आहेत, त्यांना जे हवे आहे किंवा त्यांना जे करायचे आहे त्यात ते हटवादीपणा करतात
आणि त्यावर ठाम राहतात. जरी काहीवेळा त्यांना ते चुकीचे आहे किंवा ते चुकीचे वागत
आहेत हे माहित असले तरीही ते त्यांच्या तीव्र अहंकारामुळे त्यांचा निर्णय बदलू
इच्छित नाहीत.
मुलांक १ चे लोक महत्वाकांक्षी असतात आणि ते त्यांच्या
कारकीर्दीला (करियरला) नेहमीच प्रथम प्राधान्य देतात. परंतु, कधीकधी ते
अति महत्वाकांक्षी बनतात आणि घाईघाईने चुकीच्या मार्गाने गोष्टी करतात.
बढाई मारणे, बढजाई करणे मुलांक १ च्या
लोकांची ही गुणवत्ता जगाला स्पष्टपणे दिसते.
ते बर्याचदा स्वतःबद्दल बोलतात आणि ते किती महान आहेत हे दर्शविण्याचा
प्रयत्न करतात. नंबर १ च्या लोकांमध्ये
नेहमीच मीपणा दिसतो, आम्ही केले यापेक्षा मी केले हेच
लोकांना ते दाखवण्याचा प्रयत्न करतात.
मुलांक १ चे लोक नेहमी स्वतःबद्दल बोलत राहतात आणि ते किती
महान आहेत हे दर्शविण्याचा प्रयत्न करतात. कृपया लक्षात घ्या की लोकांमध्ये
सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गुणांचे मिश्रण असू शकते. एक अतिशय यशस्वी तर
एखादा अती प्रमाणात बढाई मारु शकतो. शिवाय त्यांच्या भाग्यांक आणि नाव
क्रमांकानुसार त्यात फरक दिसतो.
मुलांक १ ने घ्यायची खबरदारी आणि सुचना:
१, १०, १९, २८ जन्म दिनांक असलेल्या
व्यक्तींनी शक्यतो खालील गोष्टी टाळाव्यात किंवा करू नये.
Ø स्वतःबद्दल जास्त बोलू नका. मी केले, माझ्यामुळे झाले, मीच करू शकतो.... हा मी पणा टाळा. जीवनातल्या कर्तृत्वाविषयी विनम्र राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
Ø लोकांना त्यांच्या
इच्छेविरुद्ध जाण्यास भाग पाडू नका. आपले कडक नियम दुसऱ्यांना पाळण्यास जबरदस्ती
करू नका.
Ø आकर्षणाचे केंद्र बनण्यासाठी
खूप प्रयत्न करु नका. तुमचे उत्कृष्ट काम आणि त्यात मिळणारे प्रचंड यशच लोकांना
तुमच्याकडे आकर्षित करतील.
Ø आपल्या निर्णयांबद्दल जास्त
हट्टी होऊ नका. आपले निर्णय दुसऱ्यांवर बळजबरीने लादू नका. अतिरेक टाळा.
Ø
कृपया टिप्पणी बॉक्समध्ये कोणताही स्पॅम लिंक प्रविष्ट करू नका. ConversionConversion EmoticonEmoticon