एक कटिंग चहाएक कटिंग चहा |  लघुकथा
एक कटिंग चहा 

 

आज हवेत थोडा गारठा वाढला होता आणि त्याच्या मनात प्रेमाचा पिसारा फुलला होतातिला पाहण्यासाठी तो भल्या पहाटे उठायचा. एरव्ही कधीही पहाटे न उठणारा तो, त्या रात्री झोपलाच नव्हता.  कधी पहाट होते आणि बाहेर पडतो असे त्याचे झाले होते


तिला भेटण्यासाठी तो खूप आतुर झाला होता
तिच्या येण्याआधीच तो morning walk ला बाहेर पडायचाती केव्हा येते याचीच वाट पाहायचातिला impress करण्याच्या नादात आज तो त्याचे स्वेटर घरीच विसरला होताताटकळत तिची वाट पहात थंडीत उभा राहिला. त्या दिवशी ती आलीच नाही. पण त्या गारठयात त्याची कुल्फी झाली. थंडीने त्याची एवढी हालत झाली कि नंतर रूमवर शेकोटी करून शेकत बसला होता.


आता रोजचा दिनक्रम ठरलेला
, तिला पाहण्यासाठी तो सकाळी घराबाहेर पडायचाती आली कि तिला संशय येऊ नये म्हणून कधी ही न केलेले व्यायामाचे प्रकार करायचाती गेली कि चोरून तिच्या मागे लागायचाएकदा तिला पहात धावता धावता तो एका खांबावर आदळून पडला होताते पाहून ती खूप हसली होती. तेव्हाच संधी साधून त्याने तिच्याशी मैत्री केलीती हसली आणि तो तिला म्हणाला एक कटिंग चहा घेऊ या का ?


टपरीवरच्या बाकावर बसून वाफाळलेल्या चहासोबत तिचं इंग्रजीतलं बोलणं त्याला कळत नव्हते
 कारण तो फक्त एक टक तिच्याचकडे पहात होता,  हे तिला ही समजले होते.


रोजची पहाट आता गुलाबी झाली
आणि  कडाक्याच्या थंडीत एक कप कटिंग चहाची गोडी दोघांनाही आवडू लागली. मैत्रीने केलेली सुरुवात आता प्रेमात रूपांतरीत झालीप्रेमाची गाडी सुसाट धावणार तोच एके दिवशी त्यांचं कडाक्याचं भांडण झालेप्रेमाच्या भेटीला विरहाचे वादळ लागले.


तिला पाहण्यासाठी आता पुन्हा त्याच गारठयात तो
 आला होताआज तरी ती भेटेल म्हणून गेले कित्येक दिवस अशीच तो  तिची वाट पहात होतारोज त्याच बाकडयावर बसून राहायचा पण ती काही यायची नाही.


आजही तो असाच शांत बसला होता
तिच्या विचारांनी अश्रूंना बांध फुटणार इतक्यात चहाचा कप पुढे सरकावत ती म्हणाली "एक कटिंग चहा घेणार का?".


Previous
Next Post »

कृपया टिप्पणी बॉक्समध्ये कोणताही स्पॅम लिंक प्रविष्ट करू नका. ConversionConversion EmoticonEmoticon