![]() |
गणपती बाप्पा मोरया |
मुखाने हे बोलू, करु श्री गणेशा
तु एकदंता, तु गणराया
लंबोदरा तु, चिंतामणी तु
भक्तांचा धनी तु, सर्वांच्या मनी तु
पार्वती मातेने तुम्हांला जन्म दिला
ते भोलेनाथ पार्वतीस आले भेटाया
वाटेत तुम्ही त्यांना अडवले
ते शंकर महादेव क्रोधीत झाले
त्रिशुल त्यांनी तुम्हावर सोडले
तेव्हा मस्तक तुमचे वेगळे झाले
वार्ता ही जेव्हा मातेस कळाली
पार्वती माता मग क्रोधीत झाल्या
व्यतीत होऊन त्यांनी कहर केला मोठा
मग नवा जन्म झाला, गजानन आला
घुमु लागला नाद तुझ्या नावाचा
तु मोरया जगी आरुढ झाला
गणपती बाप्पा प्रसिध्द झाला
कानी कपाळी तुझे गुन गान
सर्वांच्या ओठी तुझेच नाव
तुझेच ध्यान करी सर्व जण
सर्वांचे तुच श्रद्धास्थान
हे वक्रतुंडा, हे विघ्नहर्ता
तुच कर्ता, तुच करवीता
जगाचे विघ्न हरण कर तु आता
तुझ्याच चरणी ठेवितो माथा
अगाध आहे तुझाच महिमा
कृपया टिप्पणी बॉक्समध्ये कोणताही स्पॅम लिंक प्रविष्ट करू नका. ConversionConversion EmoticonEmoticon