दमदार संवाददमदार संवाद


चित्रपट संवाद
चित्रपट म्हटला कि त्यात मधुर गाणी आलीच, त्याचबरोबर दमदार संवाद असायलाच हवे. मी मराठी चित्रपट कथा लिहील्या आहेत, त्यातलेच काही निवडक संवाद या विभागात तुम्हाला वाचायला मिळतील. 

 

आपण एकदाच बोलतो आणि फार कमी बोलतो. 
पण जे बोलतो ते अगदी मनापासून बोलतो. 
आता ते तुम्हालाच कळत नाही, यात माझा काय दोष आहे.

    

प्रारब्ध कोणाला चुकवता येत नाही. देव झेपेल इतकेच दुःख आपल्याला देतो 
आणि झेपणार नसेल तर सरळ वर बोलवतो.  

© at SWA २९६८६३ चित्रपट कथा -  मला आत्महत्या करायची आहे.अरे त्यापेक्षा डोळ्यात आत्मविश्वासाची चमक आणि मनगटात अशी धमक ठेव. 
कोळशात जरी हाथ घातलास तरी त्यातून हिराच काढशील. 

   © at SWA २९६८६३ चित्रपट कथा - मला आत्महत्या करायची आहे 

आयुष्यात रंगत तेव्हाच येते, जेव्हा तुझ्यासोबत एक सुंदर गर्लफ्रेंड असते. 


आपल्याशी जो भिडला त्याने या जगाचा अखेरचा निरोप घेतला.
थोडक्यात सांगायचं तर जो नडला तो कायमचा संपला. आमचा साहेब सर्वांचे ऐकतो पण जो त्यांचे ऐकत नाही, त्याची वाजवतो..... पुंगी  
येऊ दे साल्याला, आज तर याच्या गच्चीतच गुच्ची घालतो. 

   © at SWA २७२७५२ चित्रपट कथा - कॉलेज कट्टा


कृष्ण नेहमी गोपिकांच्या घोळक्यात असतो.

आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट,

तुझ्यासारख्या नामर्द बाईमाणसाच्या पुढे बसण्यापेक्षा ती जागा उत्तमच आहे

© at SWA २७२७५२ चित्रपट कथा - कॉलेज कट्टाPrevious
Next Post »

कृपया टिप्पणी बॉक्समध्ये कोणताही स्पॅम लिंक प्रविष्ट करू नका. ConversionConversion EmoticonEmoticon