अंकशास्त्र | Numerology

 

अंकशास्त्र | Numerology

अंकशास्त्र | Numerology


या जगात प्रत्येकाला आपले भविष्य जाणुन घ्यायचे असते. वर्तमान काळात काय चालू आहे यापेक्षा भविष्यात काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो. त्यासाठी कोणी ज्योतिष शास्त्राची मदत घेतोकोणी हस्तरेखा पहातोतर कोणी अंकशास्त्राचा आधार घेतो.

अंकशास्त्र (संख्याशास्त्र) ज्याला आपण इंग्रजीत Numerology म्हणुन ओळखतोतेच अंकशास्त्र आपणा सर्वांच्या आयुष्याचा भाग आहे. तुमच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत हेच अंक तुमचा पाठलाग करत आहेत. विश्वास बसत नाही ना! आठवुन बघा... 

तुमचा जन्मदिनांकतुमची जन्माची वेळतुम्ही जिथे राहता त्या ठिकाणाचा पत्ता (उदाहणार्थ: सदनिका क्रमांक,  इमारत क्रमांकखोली नंबरचाळ नंबररोड नंबरपहिला मजला/ दुसरा मजला...पिन क्रमांक),  तुम्ही जो दुरध्वनी (Telephone) / भ्रमणध्वनी (mobile phone) वापरता त्याचा संपर्क क्रमांक - IMEI नंबर [१५ डिजिट International Mobile Equipment Identity] यात अंकच आहेत.

तसेच तुम्ही जे वाहन वापरता त्याचा नंबरतुम्ही ज्या वाहनाने लांबचा प्रवास करता (उदाहणार्थ: Train चा PNR नंबरएअरपोर्ट मध्ये Terminal number - flight number) तुम्ही जे घड्याळ वापरता त्यातले नंबरतुम्ही ज्या शाळेत शिक्षण घेता त्यातली इयत्ता क्रमांक त्यातसुद्धा अंकच आहेत.

इतकेच काय तुम्ही जे उत्पादन विकत घेता त्यावर असणारा बार कोडउत्पादन क्रमांक (Product Key Number), अनुक्रमांक (Serial Number), तुम्ही जो डेस्कटॉप संगणक/ लॅपटॉप वापरता त्याचा IP address, बारा महिने- ३६५ दिवस पाहण्यासाठी वापरले जाणारे दिनदर्शिका (Calendar) आणि शेवटी ज्या दिवशी तुमचा मृत्यु होतो तो दिवस/मृत्यु दिनांक या सर्व ठिकाणी अंकच असतात.  

थोडक्यात सांगायचे झाले तर यत्र सर्वत्र अंकच अंक म्हणजे या अंकांचा तुमच्या आयुष्याशी फार मोठा संबंध आहे. तसेच अंकशास्त्राचा गाभा ज्योतिष शास्त्राशी संबंधित आहे. ज्योतिष शास्त्राप्रमाणे जसे बारा ग्रहसत्तावीस नक्षत्र आहेत तसेच अंकशास्त्रात प्रत्येक अंकामागे एक ग्रह कार्यरत आहे. सविस्तर माहिती पुढे आपणास वाचायला मिळेलच.     



    अंकशास्त्राची तोंडओळख | Introduction To Numerology:

    अंकशास्त्रामध्ये वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात.  पायथॉगोरिअन (Pythagorean), चाल्डीयन(Chaldean), चिरो(Cheiro), कब्बालाह (Kabbalah), हिलिन हिचकॉकची पद्धत (Helyn Hitchcock's method), ध्वन्यात्मक (Phonetic), जपानी (Japanese), अरबी (Arabic) आणि भारतीय पद्धत संख्याशास्त्रामध्ये वापरल्या जातात.

    पायथॉगोरिअन (Pythagorean) पद्धत मुख्यतः पाश्चात्त्य देशांमध्ये प्रचलित आहे. यालाच इंग्रजी अंकशास्त्र (English Numerology), आधुनिक वेस्टर्न न्युमरोलॉजी असेही ओळखले जाते.  पायथॉगोरिअन पद्धत पायथागोरसने विकसित केली होती. पायथागोरस एक ज्योतिषीअंकशास्त्रज्ञसंगीतकार आणि आध्यात्मिक गुरू होते. त्यांनी ए ते झेड पर्यंतची अक्षरे अनुक्रमे १ ते ९ अंकामध्ये विभागले आहेत

    चाल्डीयन (Chaldean)  हे प्राचीन लोक होते ज्यांनी बॅबिलोनियावर राज्य केले. म्हणूनया प्रणालीला बॅबिलोनियन संख्याशास्त्र प्रणाली म्हणून देखील ओळखले जाते. चाल्डीयन (Chaldean)  पद्धत १ ते ८ संख्या वापरते. संख्या ९ या पद्धतीत वापरली जात नाही९ ही संख्या हेतूपुरस्सर सोडली गेली कारण ९ या संख्येला प्राचीन लोक पवित्र संख्या मानत होते. 

    पंडित सेतुरामन यांनी चाल्डीयन (Chaldean) प्रणाली व कबाला प्रणालीवर व्यापक संशोधन केले आणि त्यांना असे आढळले कीजगातील संख्याशास्त्राची एकमेव अचूक प्रणाली चाल्डीयन (Chaldean) संख्याशास्त्र आहे. पंडित सेतुरामन हे जगातील प्रख्यात होतेज्यांनी चाल्डीयन संख्याशास्त्रातील १०८ क्रमांकाचे अर्थ लावले. 

     

    पायथॉगोरिअन अंकशास्त्र  वापरण्याची पद्धत   | How to use Pythagorean Numerology:

    पायथॉगोरिअन अंकशास्त्र | Pythagorean Numerology
    पायथॉगोरिअन अंकशास्त्र | Pythagorean Numerology


    पायथॉगोरिअन अंकशास्त्रात इंग्रजीतल्या ए ते झेड (A to Z) वर्णमालेला १ ते ९ संख्येमध्ये विभागले आहे.

    जेएस (A,J,S)= 

    बीकेटी (B,K,T) =  

    सीएलयू (C,L,U) = 

    डीएमव्ही (D,M,V) = 

    एनडब्ल्यू (E,N,W) = 

    एफएक्स (F,O,X) = 

    जीपीवाय (G,P,Y) = 

    एचक्यूझेड (H,Q,Z) = 

    आयआर (I,R) =

     

    चाल्डीयन अंकशास्त्र वापरण्याची पद्धत | How to use Chaldean Numerology:

    चाल्डीयन अंकशास्त्र | Chaldean Numerology
    चाल्डीयन अंकशास्त्र | Chaldean Numerology


    चाल्डीयन अंकशास्त्रात इंग्रजीतल्या ए ते झेड (A to Z) वर्णमालेला १ ते ८ संख्येमध्ये विभागले आहे.

    आयजेक्यू,  वाय (A, I,  J, Q, Y) = 

    बीकेआर (B,K,R) = 

    सीजीएलएस (C,G, L,S) = 

    डीएमटी (D,M,T) = 

    एचएनएक्स (E,H,N,X) = 

    यूव्हीडब्ल्यू  (U,V,W) = 

    झेड (O,Z) = 

    पीएफ (P,F) = 


    चाल्डीयन अंकशास्त्राचा अंतिम मार्गदर्शक घटक    The Ultimate Guide element of Chaldean Numerology:

    अंकशास्त्रामध्ये तुमचा मुलांक आणि भाग्यांक पाहिला जातो. मुलांक म्हणजे तुमची जन्मदिनांकज्या दिवशी तुमचा जन्म झाला ज्याला इंग्रजीत birth number म्हणतात. भाग्यांक म्हणजे तुमच्या संपुर्ण जन्मतारखेची येणारी बेरीज. भाग्यांक ज्याला इंग्रजीत Destiny Number, Life Path Number असे ही म्हणतात. 

    उदाहणार्थ तुमचा जन्म १ जानेवारी १९९२ ला झाला असेल तर,

    तुमचा मुलांक १ आहे

    तुमचा भाग्यांक ५ आहे    (१+१+१+९+९+२ = २३ = ५  [२+३ = ५])

     

    उदाहणार्थ तुमचा जन्म २७ डिसेंबर १९८७ ला झाला असेल तर,

    तुमचा मुलांक ९ आहे.  (२+७ = ९)

    तुमचा भाग्यांक १ आहे.  (२+७+१+२+१+९+८+७ = ३७  = १०  [३+७ = १० = १+० = १])

    संख्याशास्त्रामध्ये प्रत्येक संख्या सृष्टीच्या उर्जेचे प्रतिनिधित्व करतात. संख्यात्मक अंकाचे  उत्साही  प्रतिनिधित्व ग्रह किंवा स्वर्गीय देहाशी संबंधित आहे. जस मी वर नमुद केल्याप्रमाणे चाल्डीयन न्यूमेरोलॉजीमध्ये प्रत्येक संख्येशी एक ग्रह निगडीत आहे. प्रत्येक अंकांशी निगडीत असणारे हे ग्रह त्या त्या अंकांसोबत अधिपत्य प्रस्थापित करतात आणि त्यानुसार आपल्या आयुष्यात त्याचा प्रभाव होतो.


    अंक आणि त्यांचे ग्रह । Planets with  Numbers
    अंक आणि त्यांचे ग्रह । Planets with Numbers 

     
       अंक | Numbers
       ग्रह | Planets
                                     सुर्य    
                    २                 चंद्र    
                    ३                 गुरु    
                    ४                 राहू        
                    ५                 बुध
                    ६                 शुक्र    
                    ७                 केतु 
                    ८                 शनि     
                    ९                मंगळ

            

    अंकशास्त्रामध्ये तीन महत्त्वाचे घटक आहेत. एक मुलांकदुसरा भाग्यांक जे तुमच्या संपूर्ण जन्मतारखेवर ठरते आणि त्यानुसार तुमचा स्वभावतुमच्या भाग्यात घडणाऱ्या गोष्टी अवलंबून आहेत. जन्मतारखेनुसार प्रत्येकाला त्या त्या ग्रहाचे चांगले वाईट परिणाम अनुभवावे लागतात. आपल्या उज्वल भवितव्यासाठी भविष्यात अधिकाधिक चांगले परिणाम मिळावे म्हणून काही जण आपल्या नावात बदल करतात. ज्याला इंग्रजीत Name Numerology म्हणतात आणि हाच तो तिसरा महत्त्वाचा घटक आहे.

    चाल्डीयन अंकशास्त्राप्रमाणे नावात बदल घडवून नव्याने आयुष्याची सुरुवात करणारे असे अनेक जण तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात पाहिले असतीलच. चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी आपल्या नावात बदल केलेले आहेत. त्याचे विश्लेषण तुम्हाला पुढे वाचायला मिळेलच. तुर्तास आपण उदाहरणादाखल चित्रपट उद्योगातील एका प्रसिद्ध कलाकाराबद्दल पाहू या.

    अजय देवगण यांचा जन्म २ एप्रिल १९६९ चा आहे. 

    यांचा मुलांक =     [चंद्र]

    यांचा भाग्यांक = २ + ४ + १ + ९ + ६ + ९ = ३१ (३ + १) = ४ [राहू]

    अजय देवगण यांचे खरे नाव विशाल विरु देवगण आहे. चित्रपट उद्योगात आधीच्या नावाच्या वर्णमालेमध्ये आणि आताच्या नावाच्या वर्णमालेमध्ये त्यांनी बदल केले आहेत.

    पूर्वीचे नाव - 

    AJAY DEVGAN = ({१+१+१+१} + {४+५+६+३+१+५}) = ४+२४ = २८ (२+८)= १० (१+०) = १ [सुर्य]

    आताचे नाव - 

    AJAY DEVGN  = ({१+१+१+१} + {४+५+६+३+५}) = ४+२३ = २७ (२+७) = ९ [मंगळ]

         अजय देवगण यांच्या आताच्या नावात इंग्रजी वर्णमालेतले  'A'  वर्णमाला वगळले आहे. त्यामुळे त्यांच्या पुढच्या आयुष्याच्या वाटचालीमध्ये त्यांच्या मुलांक २ आणि भाग्यांक ४ ला 'AJAY DEVGN' या बदलेल्या नावाने मंगळ ग्रहाचा पुरक असा प्रभाव पडावा जो त्यांच्या पूर्वीच्या नावात 'AJAY DEVGAN' ला सुर्य ग्रहाचा अनुकुल परिणाम देत नाही म्हणून त्यांच्या नावातल्या अंकशास्त्रामध्ये बदल केले गेले. 

    चंद्रशुक्र आणि सुर्य ग्रह चित्रपट उद्योगासाठी अनुकूल आहेत. थोडक्यात अजय देवगण यांचा मुलांक २ म्हणजे चंद्र ग्रह (मनाचा कारक - उत्तम अभिनय)भाग्यांक ४ म्हणजे राहू (कामात परिपूर्णतापरिपक्वता) आणि Name Numerology नाव अंकशास्त्र ९ म्हणजे मंगळ ग्रह (कामात गतीप्रगती) दर्शवतो. 

    आता मुलांक १ ते ९ आणि भाग्यांक १ ते ९ आपण पुढे लवकरच पाहू.

    अंक, ग्रह  आणि मुलांक | Numbers, Planets and Birth Numbers:

    चाल्डीयन अंकशास्त्राप्रमाणे प्रत्येक अंकावर एकेका ग्रहाचा अंमल आहे आणि तेच ग्रह या अंकशास्त्रात त्यांच्या मुलांक, भाग्यांक आणि नावाच्या  क्रमांकावर शासन करतात. प्रत्येक ग्रहाची एक प्रवृत्ती आहे आणि तीच तुम्हाला प्रत्येकाच्या मुलांक संख्या, भाग्यांक आणि नावाची संख्या असणाऱ्या व्यक्तीमध्ये दिसते.

    चाल्डीयन अंकशास्त्रामध्ये अंक १ वर सुर्य ग्रहाचा प्रभाव आहे, अंक २ वर चंद्र ग्रहाचा प्रभाव आहे, अंक ३ वर गुरु ग्रहाचा प्रभाव आहे, अंक ४ वर राहूचा प्रभाव आहे, अंक ५ वर बुध ग्रहाचा प्रभाव आहे, अंक ६ वर शुक्र ग्रहाचा प्रभाव आहे, अंक ७ वर केतुचा प्रभाव आहे, अंक ८ वर शनि ग्रहाचा प्रभाव आहे आणि अंक ९ वर मंगळ ग्रहाचा प्रभाव आहे.  

    सुर्य ग्रह म्हणजे महत्त्वकांक्षी  ग्रह, अनुशासन, नियमांचे पालन करणारा, तेजस्वीपणा, काटेकोरपणा, वक्तशीरपणा आणि विश्वातल्या सर्व प्राणीमात्रांना प्रकाश देणारा आहे. सुर्य ग्रहाचा अंमल असणारी व्यक्ती आपल्या वेळेला आणि आपल्या कामाला खूप महत्त्व देते. असे अनेक वेगवेगळे गुणधर्म आणि काही गुणदोष सुर्य ग्रहाचा प्रभाव असणाऱ्या मुलांक १ च्या जन्म दिनांक १, १०, १९ आणि २८  मध्ये दिसतात.   

    चंद्र ग्रह म्हणजे मनाचा कारक, चंचलता, हळवेपणा, भावनाप्रधान, भावनिक चढ-उतार, शीतलता प्रदान करणारा, लहरी प्रवृत्ती असणारा, उत्साही ग्रह आहे. असे अनेक वेगवेगळे गुणधर्म आणि काही गुणदोष चंद्र ग्रहाचा प्रभाव असणाऱ्या मुलांक २ च्या जन्म दिनांक , ११, २० आणि २९ मध्ये दिसतात.   

    गुरु ग्रह म्हणजे निस्वार्थी, धैर्यवान, न्यायप्रिय, शिस्तबद्ध, बुद्धीमान, कठोर परिश्रम करणारा, यशस्वी अंमलबजावणी करणारा, सेवा प्रदान करणारा आणि प्रसंगी बलिदान देणारा, मुत्सद्दी, ज्ञानी ग्रह आहे. असे अनेक वेगवेगळे गुणधर्म आणि काही गुणदोष गुरु ग्रहाचा प्रभाव असणाऱ्या मुलांक  ३ च्या जन्म दिनांक , १२, २१ आणि ३० मध्ये दिसतात.    

    राहूचा अंमल असणाऱ्या लोकांमध्ये  लढाऊ वृत्ती, तल्लख स्मरणशक्ती, उत्कृष्ट संप्रेषण कौशल्य, बळकट मनोधैर्य, उत्साहपूर्ण ऊर्जा, व्यावहारिक दृष्टीकोन, संयमी, उदारपणा पहायला मिळेल. असे अनेक वेगवेगळे गुणधर्म आणि काही गुणदोष राहूचा प्रभाव असणाऱ्या मुलांक  ४ च्या जन्म दिनांक  ४, १३, २२ आणि  ३१ मध्ये दिसतात.     

    बुध ग्रह हा पुण्य आणि निर्मळ ग्रह आहे. बुध ग्रह म्हणजे वाचा, उत्कृष्ट वक्तृत्व, तीव्र बुद्धिमत्ता, सर्जनशील, हुशार, चपळ, आनंदी, उत्साही, चैतन्यशील, व्यवहारज्ञान आणि उत्कृष्ट संवाद कौशल्य असणारा ग्रह आहे. बुध ग्रहाच्या अंमलाखाली असणाऱ्या व्यक्तीचे त्याच्या वाचेवर प्रभुत्व असते. यांचा जनसंपर्क मोठा असतो. असे अनेक वेगवेगळे गुणधर्म आणि काही गुणदोष बुध ग्रहाचा प्रभाव असणाऱ्या मुलांक ५ च्या जन्म दिनांक , १४ आणि २३ मध्ये दिसतात.    

    शुक्र ग्रह म्हणजे अत्यंत रोमँटिक, प्रणयरम्य, निसर्गप्रेमी, सुखाची वेगळी परीभाषा सांगणारा, विलासी वृत्ती जगणारा, उत्कट प्रेमभाव असणारा, अत्यंत भावनिक, क्रिएटिव्ह, जबाबदार, उत्साही, संवेदनशील  आणि एक लाभदायक असा ग्रह आहे. असे अनेक वेगवेगळे गुणधर्म आणि काही गुणदोष शुक्र ग्रहाचा प्रभाव असणाऱ्या मुलांक ६ च्या जन्म दिनांक  , १५ आणि २४ मध्ये दिसतात.    

    केतुमध्ये कल्पकता, नवनिर्मितीक्षमता, अस्सलपणा, अंतर्ज्ञानी शक्ती, संवेदनशीलता, तत्वज्ञानी, चुंबकीय व्यक्तिमत्व दिसते. केतुचा अंमल असणाऱ्या व्यक्ती पर्यावरणाशी जुळवून घेणाऱ्या, अंतर्मुख, अध्यात्मिक, मुद्देसूद  बोलणाऱ्या, उत्कृष्ट विश्लेषणात्मक कौशल्ये असणाऱ्या, गुप्त स्वभावाच्या पण  खूप रोमँटिक, एक्सप्रेसिव्ह आणि मनातून प्रेमळ असतात. ते  चांगले वक्ते असतात पण अतिसक्रिय मेंदूमुळे आतून फारच अस्वस्थ असतात. असे अनेक वेगवेगळे गुणधर्म आणि काही गुणदोष केतुचा प्रभाव असणाऱ्या मुलांक ७ च्या जन्म दिनांक ७, १६ आणि २५ मध्ये दिसतात.    

    ज्योतिषशास्त्राप्रमाणे बहुतेक लोकांना असे वाटते की शनि ग्रह केवळ नकारात्मक परिणाम देतो जे खरे नाही. शनिची साडेसाती आली कि लोक घाबरतात पण याच साडेसातीत आपल्याला बऱ्याच गोष्टींचा अनुभव शिकायला मिळतो. उदाहरण द्यायचे झाले तर, व्यापारात तुम्हाला नुकसान झाले, ते कोणामुळे झाले किंवा का झाले हे तुम्हाला कळते.

     कालपर्यंत जे तुमच्या सोबत मित्र म्हणून होते ते आज तुम्ही अडचणीत असताना तुमची साधी विचारपूससुद्धा करायला आले नाही, ज्याच्याकडून तुम्हाला पैशांची मदत मिळेल असे वाटत होते, तोच आता तुमच्यापासून नॉट रिचेबल झाला आहे.

    तुम्ही आजारी पडलात आणि तुम्ही ज्याची वाट पाहत आहात तो तुम्हाला भेटायला आलाच नाही पण अचानक एक फार जुना मित्र तुम्हाला भेटतो, तुमची विचारपूस करतो आणि तुम्हाला धिर देतो असे अनेक कडू-गोड प्रसंगातून शनि ग्रह तुम्हाला जगाकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पहायला शिकवतात.      

    शनि ग्रह म्हणजे न्यायप्रियता, स्व-केंद्रित आणि शिस्तीचा ग्रह आहे, त्याला कर्मफलदाता आणि दंडनायक म्हणून सुद्धा ओळखले जाते. शनिचा अंमल असणाऱ्या व्यक्ती आयुष्यात कधीही आशा गमावत नाहीत. त्यांच्यात प्रबळ इच्छाशक्ती, लढाऊ वृत्ती, प्रयत्नशीलता दिसते तसेच ते भावनिकदृष्ट्या बळकट, आणि सहजपणे आव्हाने स्वीकारतात, सतत कठोर परिश्रम करतात आणि भरपूर मेहनत करतात, अपयशांवर मात करण्यास सक्षम असतात. सामान्यत: नियोजित मार्गाने त्यांचे जीवन जगतात. असे अनेक वेगवेगळे गुणधर्म आणि काही गुणदोष शनि ग्रहाचा प्रभाव असणाऱ्या मुलांक ८ च्या जन्म दिनांक , १७  आणि २६ मध्ये दिसतात. 

    मंगळ ग्रह म्हणजे वेग, प्रचंड ऊर्जा असणारा ग्रह आहे. मंगळाचा अंमल असणाऱ्या व्यक्ती तापट स्वभावाच्या पण अत्याधिक ऊर्जावान, सर्वात जास्त उत्साही, कठोर परिश्रम करणारे, साहसी, दृढनिश्चयी, सर्वात जास्त सक्रिय, खेळात उत्कृष्ट, आशावादी, धैर्यवान, उत्कृष्ट प्रेरक आणि धाडसी असतात. ते एक योद्धा आहेत तसेच कमांडर इन चीफ म्हणून ओळखले जातात. असे अनेक वेगवेगळे गुणधर्म आणि काही गुणदोष मंगळ ग्रहाचा प्रभाव असणाऱ्या मुलांक ९  च्या जन्म दिनांक , १८ आणि २७ मध्ये दिसतात.          

    Previous
    Next Post »

    कृपया टिप्पणी बॉक्समध्ये कोणताही स्पॅम लिंक प्रविष्ट करू नका. ConversionConversion EmoticonEmoticon