सांग ना


सांग ना  |  गाणी

सांग ना...!


सांग ना ... सांग ना

काय केला मी गुन्हा

सांग ना तु मला !

का अबोला हा धरलास तु, सांग ना ... सांग ना?

 

बोलके डोळे तुझे, सांगते सर्व काही

का मुक्याने छळतेस तु, सांग ना ... सांग ना?

 

स्पर्श तुझा बोलतो मला, सावरू दे तुला

का अनावर  झाला राग तुझा, सांग ना ... सांग ना?

 

दुर राहतेस तु , ठेवूनी अंतर

का दुरावा दोघात आपल्या असा, सांग ना ... सांग ना?

 

का? ही शिक्षा दिली मला !

वाट पाहतो मी तुझी,

शांत होशील तु केव्हा कधी, सांग ना ... सांग ना

 

सोड हा रुसवा तुझा, माफ कर ना मला

हट्ट हा सोड आता तुझा.

येउनी मिठीत माझ्या,  हसशील केव्हा तु  ... सांग ना

सांग ना ... सांग ना….!...?


                                                                        - संदीप लक्ष्मण पोळ.


Previous
Next Post »

कृपया टिप्पणी बॉक्समध्ये कोणताही स्पॅम लिंक प्रविष्ट करू नका. ConversionConversion EmoticonEmoticon